Soybean Rate : सोयाबीन दर पुन्हा वाढणार का?

देशातील बाजारात सोयाबीन दरात मागील दोन दिवस नरमाई दिसली होती. मात्र आज सोयाबीनचे दर काहीसे स्थिरावले होते. तर काही बाजार समित्यांमध्ये दरात सुधारणा पाहायला मिळाली.
Soybean Production
Soybean ProductionAgrowon
Published on
Updated on

पुणेः सोयाबीन बाजार (Soybean Market) मागील तीन दिवसांमध्ये तुटला होता. मात्र आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात (Soybean Rate Global Market) काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. सोयातेलाचे दरही (Soy Oil Rate) किंचित वाढले होते. देशातही सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) काही ठिकाणी सुधारणा झाली होती.

Soybean Production
Soybean Market: सोयाबीनचे दर का कमी झाले?

देशातील बाजारात सोयाबीन दरात मागील दोन दिवस नरमाई दिसली होती. मात्र आज सोयाबीनचे दर काहीसे स्थिरावले होते. तर काही बाजार समित्यांमध्ये दरात सुधारणा पाहायला मिळाली. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि खाद्यतेलाच्या दराप्रमाणे देशातील सोयाबीन दरात चढउतार होत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये निर्यात सुरु राहण्यासाठी सहमत झाल्याचे वृत्त आल्यानंतर पामतेलाच्या दरात घसरण पाहायला मिळाली. पामतेलाचे दर ४ हजार २९३ रिंगीट प्रतिटनावरून ३ हजार ८३६ रिंगीटवर आले. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे.

Soybean Production
Soybean Rate : कळमन्यात सोयाबीन आवक मंदावली

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे दर १७ नोव्हेंबरला १४.१६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. त्यानंतर दरात वाढ होत गेली. मात्र आज सोयाबीन दराने आठवड्यातील उच्चांकी दर गाठत पुन्हा नांगी टाकली. सीबाॅटवर आज सोयाबीनचे वायदे १४.३६ डाॅलर प्रतिबुशेल्सने पार पडले. सीबाॅटवर आज सोयतेलाच्या दरातही सुधारणा पाहायला मिळाली. काल सोयातेलाने निचांकी ६९.४२ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. मात्र आज दीड टक्क्यांपर्यंत सुधारणा होऊन ७१.६४ सेंटवर दर पोचले.

देशातही मागील चार दिवसांमध्ये सोयाबीन दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची तूट आली होती. मात्र आज अनेक बाजारांमध्ये दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. पण बहुतांशी ठिकाणी सोयाीबनचे दर स्थिर होते. दुसरीकडे दर कमी झाल्यानंतर बाजारातील आवक वाढलेली नाही. आज देशातील बाजारात जवळपास २ लाख ८० हजार क्विंटलची आवक झाली होती. यात मध्य प्रदेशातील आवक सव्वा लाख क्विंटलच्या दरम्यान होती. तर महाराष्ट्रात १ लाख टन सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं, अशी माहिती व्यापारी सुत्रांनी दिली.

देशात आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ६०० ते ५ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील सोयाबीनच्या दरात जास्त घट होण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांना चालू हंगामात सोयाबीनसाठी ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com