Indian Sugar Production Ageowon
ॲग्रोमनी

Sugar Production : एल निनो असतानाही भारतातील साखर उत्पादन वाढणार?

EL Nino : भारताच्या माॅन्सूनवर यंदा एल निनोचे सावट असल्याने साखर उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केला जात आहे. पण युएसडीएने भारतीतील साखर उत्पादन २०२३-२४ च्या हंगामात ४० लाख टनांनी वाढून ३६० लाख टनांवर पोचेल, असा अंदाज व्यक्त केला.

Team Agrowon

Indian Sugar Production : भारताच्या माॅन्सूनवर यंदा एल निनोचे सावट असल्याने साखर उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केला जात आहे. पण युएसडीएने भारतीतील साखर उत्पादन २०२३-२४ च्या हंगामात ४० लाख टनांनी वाढून ३६० लाख टनांवर पोचेल, असा अंदाज व्यक्त केला.

पण एल निनोचा फटका बसल्यास उत्पादनात घट दिसू शकते, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला.

अमेरिकेच्या कृषी विभाग अर्थात युएसडीच्या जागतिक साखर मार्केट आणि व्यापार अहवालात यंदा भारतातील उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला. भारताचे साखर उत्पादन यंदा ४० लाख टनांनी वाढणार आहे.

त्यामुळे साखर उत्पादन ३६० लाख टनांवर पोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच उद्योगांकडून यंदा वापर वाढण्याचा अंदाज असून एकूण वापरही जास्त राहील, असा अंदाज आहे.

भारताचे साखर उत्पादन २०२२-२३ च्या हंगामात ३२८ लाख टनांवर स्थिरावल्याचा अंदाज आहे. चालू हंगामात अवकाळी पावसामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकात विशेष घट झाली. तर इस्माचा अंदाज जुलै महिन्यात येऊ शकतो.

फिच सोल्यूशनच्या बीएआय या संशोधन संस्थेने म्हटले आहे की, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज आहे. पण हे नेहमी घडत नाही. २०१५-१६ मध्ये एल निनोमुळे साखर उत्पादनात घट झाली होती. भारतासोबतच थायलंडसह काही देशांच्या साखर उत्पादनाही घट पाहायला मिळाली होती.

एल निनोचा जास्त परिणाम झाल्यास साखर उत्पादनात १० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. वातावरण पुरक राहिल्यास जागतिक साखर उत्पादन ६९ लाख टनांनी वाढू शकते. २०१५-१६ मध्ये एल निनोमुळे जागतिक साखर उत्पादनात ७.१ टक्क्यांनी घट झाली होती.

त्रिवेणी इंजिनिअरिंग अॅन्ड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष तरूण साहणी म्हणाले की, एल निनोचा काहीसा परिणाम होऊ शकतो. साखरेच्याबाबतीत बोलायचे झाल्यास आपल्याकडे आजही शिल्लक स्टाॅक आहे.

युएसडीएच्या अहवालानुसार जगातील साखर उत्पादन २०२३-२४ च्या हंगामात १०६ लाख टनांनी जास्त राहू शकते. जागतिक उत्पादन यंदा १ हजार ८७९ लाख टनांवर पोचेल. यंदा ब्राझील आणि भारतात उत्पादन वाढेल. तर रशियात उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे.

जागतिक साखरेचा वापर वाढला

२०२३-२४ च्या हंगामात जागतिक साखरेचा वापर वाढण्याचा अंदाज आहे. या हंगामात जागतिक साखरेचा वापर वाढून १ हजार ८०४ लाख टनांवर पोचेल. वापर वाढल्यामुळे पुढील हंगामातील शिल्लक साठा ३३४ लाख टनांवर राहील.

यामुळे साखरेच्या दरावरही परिणाम दिसू शकतो. भारताची साखरेची मागणी ३१० लाख टनांवर राहण्याचा अंदाज आहे. तर भारतातून ७० लाख टनांची निर्यात होऊ शकते, असा अंदाज आहे.

ब्राझीलमधील ऊस काढणीवर परिणाम होणार?

एल निनोमुळे ब्राझीलमध्ये जास्त पाऊस होतो. ब्राझील जगात साखर उत्पादनात आघाडीवर असतो. २०१५-१६ मध्ये एल निनोच्या काळात ब्राझीलमध्ये पावसामुळे ऊस काढणी खोळंबली होती. ब्राझीलचा हंगाम डिसेंबरपर्यंत लांबला होता. यंदाही अशी स्थिती निर्माण होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT