Jalna News : पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली शेती आणि अस्मानी-सुलतानी संकटांना सामोरे जाणारा शेतकरी, त्याच्या हातात एकमेव आधार असतो तो म्हणजे पीकविमा. मात्र, यावर्षी शासनाने योजनेत बदल केल्याने गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात पीकविमा भरणा कमी झाला आहे. .दरम्यान, जिल्ह्यातील फक्त दोन लाख ६१ हजार ५५ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवून पाच लाख ५२ हजार १४६ पीकविमा अर्ज दाखल केले आहेत. मागील दोन वर्षे राज्यभरात एका रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात आली. २०२४ मध्ये जिल्ह्यात तीन लाख ९४ हजार १४२ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवून नऊ लाख १७ हजार ४३६ पीकविमा अर्ज दाखल केले. .Crop Insurance : सोलापुरात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांकडून कमी प्रतिसाद.मात्र, यावर्षीपासून शासनाने विमा योजनेत बदल केले आहेत. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्याने विमा भरण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी १४ ऑगस्टची अंतिम मुदतवाढ देऊनही फक्त दोन लाख ६१ हजार ५५ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. .Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच .मात्र, आता सुधारित विमा योजनेनुसार पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर विमा ठरणार आहे. ही प्रक्रियादेखील उशिरापर्यंत चालणारी आहे. महसूल मंडळात झालेली नुकसानीची सरासरी काढली जाणार आहे. मात्र, एखाद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले, तरी त्याला सरासरीनुसारच विमा मिळणार आहे..विमा मिळणार का? संभ्रमपूर्वीच्या विमा योजनेत अतिवृष्टी किंवा ढगफुटी होऊन पिकांचे नुकसान झाले, तर ७२ तासांच्या आत शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे तक्रार करता येत होती. त्यानंतर कंपनी प्रतिनिधी बांधावर जाऊन पंचनामे करत.cr.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.