Solapur News : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सलग जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर अधिक वाढल्याने शेतातील उभे पीक पाण्यात गेल्याचे चित्र आहे. विशेषतः भात, सोयाबीन, आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. काही ठिकाणी नाल्यांना पूर आल्याने शेतीचे पाणी बाहेर निघण्यास अडथळा निर्माण झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. .जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. ऑगस्ट महिन्याची पावसाची सरासरी १०७ मिलिमीटर आहे. पण पहिल्या पंधरवड्यातच ११७ मिलिमीटर पावसाने महिन्याची सरासरी ओलांडली आहे. .Heavy Rain Solapur : ‘दक्षिण’मध्ये दुप्पट, ‘उत्तर’ला दीड पट पाऊस .सोलापुरात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी तालुक्यातील बक्षी अनेक भागात सर्वत्र पाणी आले आहे..जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परिश्रमाने जोपासलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मागील चार दिवसात तर त्याचा जोर आणखीनच वाढला आहे. या पावसामुळे या भागात नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. .रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे अनेक गावात नदी आणि ओढ्यांना पूर सदृश परिस्थिती आली आहे. नदी- ओढ्यांवर आलेल्या पुरामुळे बक्षी हिप्परगे ते सोलापूर जिल्ह्यातील वरळेगांव, वडजी आणि मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील खडकी धोत्री या मार्गाची वाहतूक खंडित झाली आहे. .Heavy Rain: अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत.मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणी साचले असून, त्यामुळे खरिपातील तूर, उडीद, सोयाबीन, मुग यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उत्तर सोलापुरातील नान्नज, मार्डी, कारंबा, वडाळा, पडसाळी, गुळवंची या भागातील अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात आहेत. .दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाने पंचनामा सहकार्य सुरू केले आहे. नुकसानीचे पंचनामे झाल्यावर राज्य शासनाला अहवाल देण्यात येणार आहे, ज्यावरुन शेतकऱ्यांना बँक खात्यांमध्ये थेट भरपाई पाठविण्यात येणार आहे..सोमवारी पुन्हा पाऊसगेल्या ४-५ दिवसांपासून सलग पाऊस होत आहे. सोमवारी (ता. १८) पुन्हा पावसाने सकाळपासूनच सुरुवात केली. सलग तिसऱ्या दिवशी सूर्यदर्शनही झाले नाही. दिवसभर मोहोळ, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाची थांबून-थांबून रिपरिप सुरुच होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.