Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market: सोयाबीन बाजार मे महिन्यातही दबावात का आला?

Sobean Rate : देशातील सोयाबीन उत्पादनात यंदा वाढ झाली. देशातील सोयाबीन उत्पादन १२४ लाख टनांवर पोचले होते. मागील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर तेजीत होते. त्यामुळे सोयाबीनलाही चांगली मागणी होती.

Team Agrowon

Soybean News : देशातील सोयाबीन उत्पादनात यंदा वाढ झाली. देशातील सोयाबीन उत्पादन (Soybean Production) १२४ लाख टनांवर पोचले होते. मागील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर तेजीत होते. त्यामुळे सोयाबीनलाही चांगली मागणी होती.

परिणामी सोयाबीनचे दर (Soybean Rate) तेजीत होते. सोयाबीनला ८ ते १० हजारांचा भाव मिळाला होता. यंदाही हंगामाच्या सुरुवातीला ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मार्चनंतर सोयाबीनचे भाव तेजीत येतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

पण यंदा सोयाबीनचा बाजार ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यानच कमी जास्त होत राहीला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव दबावात आले. ब्राझीलमधील सोयाबीन काढणी पूर्ण झाल्यानंतर बाजारात येत आहे.

तर अमेरिकेतील सोयाबीन लागवड वेगाने सुरु आहे. या दोन्ही घटकांचा आंतरराष्ट्रीय बाजारावर प्रामुख्याने दबाव दिसत आहे. देशात मात्र सोयाबीन भाव स्थिर दिसतात. 

अमेरिकेतील घटलेले उत्पादन आणि अर्जेंटीनातील दुष्काळामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव वाढले होते. परिणामी भारतीय सोयापेंडला मागणमी वाढली. भारतातून सोयापेंड निर्यात वाढल्याचा आधार सोयाबीनला मिळाला.

पण खाद्यतेलाचे दर जास्त होते त्यामुळे सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात मोठी घट केली. सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात दोन वर्षासाठी शुल्कमुक्त केली.

आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारातही खाद्यतेलाचे भाव कोसळले. यामुळे देशात खाद्यतेलाची आयात वाढली. देशात खाद्यतेलाचे साठे तयार झाले.परिणामी देशात सोयाबीन तेलाचे दरही दबावात आले.

चालू हंगामात सुरुवातीपासूनच सोयाबीनला सोयातेलाचा आधार मिळाला नाही. सोयाबीनला केवळ सोयापेंडकडून आधार मिळाला. पण यंदा ब्राझीलमध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाले. आता ब्राझीलचे सोयाबीन बाजारात येत आहे. याचा दबाव आंतरराष्ट्रीय बाजारावर आहे.

परिणामी सोयापेंडचे दर कमी झाले. भारतीय सोयापेंडला मागणीही कमी झाल्याचे निर्यातदार सांगत आहेत. त्यामुळे सोयाबीनचे भाव स्थिरावले आहेत. पण हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनचे भाव एका पातळीभोवती फिरत आहेत.

मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह उद्योगांकडूनही केली जात आहे.

सरकारने आयातशुल्कात वाढ केल्यास खाद्यतेलाचे दर वाढून सोयाबीनलाही आधार मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आयातशुल्कात वाढ करणे गरजेचे आहे.

सध्या देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवकही बऱ्यापैकी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारावही ब्राझीलचे सोयाबीन आणि अमेरिकेतील सोयाबीन लागवडीचा परिणाम दिसत आहे.

त्यामुळे सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडचे भाव दबावात आहेत. शेतकऱ्यांना खरिपाच्या लागवडीसाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तसेच पावसाळ्यात साठवणुकीच्या समस्याही तयार होतात. त्यामुळे शेतकरी सोयाबीन विकत आहेत.

परिणामी बाजारातील आवकही सरासरीपेक्षा जास्त दिसते. लागडीसाठी सोयाबीन बाजारात येऊन गेल्यानंतर आवक पुन्हा कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच एल निनोचा देशातील सोयाबीन पिकावर काय परिणाम होतो, याकडेही सोयाबीन बाजाराचे लक्ष आहे.

त्यामुळे पुढील काळात सोयाबीनच्या दरात काही काळासाठी तेजी येऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT