Wheat Rate Agrowon
ॲग्रोमनी

Wheat Rate : गव्हाचे दर वाढूनही बाजारात माल का नाही?

देशातील बाजारात यंदा गव्हाचे दर तेजीत आहेत. सरकारनं निर्यातबंदी करूनही दरात जवळपास ११ टक्यांची सुधारणा झाली.

Radhika Mhetre

पुणेः देशातील बाजारात यंदा गव्हाचे दर (Wheat Rate) तेजीत आहेत. सरकारनं निर्यातबंदी करूनही दरात जवळपास ११ टक्यांची सुधारणा झाली. तर गहू पिठाचे दरही वाढले. असं असूनही बाजारात गव्हाची आवक नगण्य होत आहे.

साधारणपणे गव्हाचे दर वाढल्यानंतर सरकार खुल्या बाजारात विक्री करुन दर नियंत्रणात ठेवते. मात्र यंदा गव्हाचे दर जवळपास ११ टक्क्यांनी वाढले. तरीही सरकारकडून खुल्या बाजारात गहू विक्रीसंदर्भात कोणत्याही हालचाली सुरु झाल्या नाहीत. याचा परिणाम बाजारातील दरावर जाणवतोय. गव्हाचा साठा असणारे स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार हळूहळू साठा बाहेर काढत आहेत. तर दुसरीकडे गव्हाला पीठ गिरण्यांची मागणी वाढलेली दिसतेय. त्यामुळे गहू आणि गहू पिठाच्या दरात तेजी आली आहे.

यंदा देशात गव्हाचं उत्पादन घटलं. तसचं निर्यातही वाढली. गहू निर्यातीचा विचार करता २०२१ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या काळात जवळपास २४ लाख टन निर्यात झाली होती. मात्र चालू वर्षात याच काळात जवाळपास ४६ लाख टन गहू निर्यात झाली. त्यामुळे देशातील बाजारात गहू दरात सतत वाढ होत आहे. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या काळात गव्हाचे दर जवळपास ११ टक्क्यांनी वाढले. तर गहू पिठाच्या दरानं १६ टक्क्यांची झेप घेतली.

सरकारने गहू आणि गहू पदार्थांच्या निर्यातीवर बंदी आणली. मात्र तरीही दरातील तेजी कायम आहे. सध्या मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी आहे. त्यामुळं पीठ गिरण्यांनी सरकारकडे साठ्यातील ३० ते ४० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची मागणी केली. पण सरकारनं आत्तापर्यंत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. यामुळं बाजारभावात आणखी सुधारणा होताना दिसतेय.

गव्हाचे दर सध्या रोजच वाढत आहेत. मागील आठवड्यात घाऊक व्यापारी आणि प्रक्रियादारांना २ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलनं गहू मिळत होता. मात्र चालू आठवड्यात ३ हजार रुपये देऊनही गहू मिळत नसल्याचं, गहू प्रक्रियादारांनी सांगितलं. मोठे स्टाॅकिस्ट आणि व्यापाऱ्यांना पुढील काळात गव्हाचे दर वाढण्याची आशा आहे. त्यामुळे ते गरजेप्रमाणं बाजारात गव्हाची विक्री करत आहेत.

प्रक्रियादारांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेतील पीठ गिरण्यांकडे जानेवारीपर्यंत पुरेल एवढा गव्हाचा साठा शिल्लक आहे. मात्र पुर्वेतील गिरण्यांकडील साठा जवळपास संपत आलाय. केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, जोनवारी २०२२ मध्ये गव्हाचा किरकोळ विक्री दर २८ रुपये प्रतिक्विंटल होता. तो चालू आठवड्यात ३१ रुपये ३० पैशांवर पोचला. तर गहू पिठाचा किरकोळ विक्री दर ३१ रुपयांवरून ३६ रुपयांपर्यंत वाढला.

देशातील नवा माल मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून बाजारात येईल. तोपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या मालावरच गरज भागवावी लागणार आहे. तसेच बाजाराचं लक्ष सरकारच्या विक्रीवरही असेल. पण  बाजारात नवा माल येईपर्यंत गव्हाचे दर तेजीतच राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT