Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : परिस्थिती अनुकूल असूनही सोयाबीन दबावात का?

गेल्यावर्षीप्रमाणं दर मिळावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन मागे ठेवले आहे. देशातून यंदा सोयापेंड निर्यात जवळपास दुप्पट झाली.

Anil Jadhao 

Soybean Rate : गेल्यावर्षीप्रमाणं दर मिळावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन (Soybean) मागे ठेवले आहे. देशातून यंदा सोयापेंड निर्यात जवळपास दुप्पट झाली. पण हंगामाचे सहा महिने झाले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धीर सुटत असून शेतकरी सोयाबीन विकत असताना दिसत आहेत.

सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. गेल्या हंगामात सोयाबीनला विक्रमी भाव मिळाला होता. गेल्या हंगामात सोयातेलाला उठाव होता. त्यामुळे सोयाबीनचे गाळप झाले.

तसेच दराच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन मागे ठेवले होते. यंदा गेल्या हंगामातील तब्बल २५ लाख टन सोयाबीन शिल्लक असल्याने सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने व्यक्त केला. त्यामुळं यंदा सोयाबीनचा पुरवठा वाढला.

सोपाच्या मते यंदा देशात १४५ लाख टन सोयाबीनचा पुरवठा झाला होता. त्यापैकी ७७ लाख टन सोयाबीनची बाजारात आवक झाली. तर जवळपास ७१ लाख टन सोयाबीन आणखी शिल्लक आहे. यापैकी सर्वच माल बाजारात येणार नाही.

यापैकी १३ लाख टनांच्या दरम्यान बियाण्यासाठी जाईल. तर अपेक्षित भाव मिळाला नाही तर काही मोठे शेतकरी, व्यापारी आणि स्टाॅकिस्ट पुढील हंगामापर्यंत ठेऊ शकतात. तसचं व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रिया प्लांट्सकडे स्टाॅक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे आता ३५ ते ४० लाख टन सोयाबीन असू शकतं, असा अंदाज काही जाणकारांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा सोयापेंड निर्यातीसाठी भारताला संधी निर्माण झाली. अर्जेंटीनात दुष्काळ पडल्याने सोयापेंडचे दर वाढले होते. तसेच सोयापेंडसाठी यंदा ब्राझीलकडे पाहावे लागत आहे. यामुळे आशियातील देश सोयापेंडसाठी भारताकडे येत आहेत.

परिणामी यंदा भारतातून मार्च महिन्यापर्यंत जवळपास १० लाख टन सोयापेंड निर्यात झाली. गेल्या हंगामात मार्चपर्यंत ४ लाख ७५ हजार टन निर्यात झाली. म्हणजेच यंदा सोयापेंड निर्यात जवळपास दुप्पट झाली.

ब्राझीलचं सोयाबीन बाजारात येईपर्यंत भारतीय सोयापेंडल चांगली मागणी होती. त्यामुळे भारतातून मार्च आणि एप्रिल महिन्यातून निर्यातीचे सौदे चांगले झाले होते.

एप्रिलमध्येही जवळपास दीड ते दोन लाख टनांची निर्यात होऊ शकते. पण मे महिन्यात भारतीय सोयापेंडला ब्राझीलच्या सोयापेंडची स्पर्धा असेल. त्यामुळे आयातदार दराची चाचपणी करत असल्याने सौदे कमी झाल्याचं निर्यातदार सांगत आहेत.

ब्राझील आणि अमेरिकेचा जैवइंधनात सोयाबीनचा वापर वाढला आहे. तर चीनही सोयाबीनची आयात करत आहे. काही दिवसांमध्ये अमेरिकेत लागवड सुरु होईल. अमेरिकेत यंदा सोयाबीन लागवड काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. पण नेमकी लागवड किती होते हे पाहावे लागेल.

पण आशियातील देशांकडून भारतीय सोयापेंडला मागणी चांगली राहू शकते. कारण ब्राझीलमधून आयात करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यामुळे हे देश भारतीय सोयापेंडलाच पसंती देतील. यामुळं सोयाबीनचा बाजार पुढील काही दिवस स्थिर दिसेल. पण नंतरच्या काळात मात्र सुधारणा दिसेल, असा अंदाज सोयाबीन बाजारात अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

Nanded Unseasonal Rain: नांदेडला अवकाळीचा केवळ हदगावला फटका

Reservoir Levels Drop: पाणीसाठ्यामध्ये तीन टक्क्यांची घट

Sangli Water Crisis: सांगलीत सिंचन योजनांसह पिण्याच्या पाण्यात कपात

Baloon Dam Issue: वाळूसाठी गिरणेवरील बलून बंधारे दुर्लक्षित

SCROLL FOR NEXT