Wheat Production
Wheat Production Agrowon
ॲग्रोमनी

Wheat Market : गहू उत्पादन १ हजार ८० लाख टनांवरच स्थिरावरणार

Anil Jadhao 

Wheat Rate : अमेरिकेच्या कृषी विभागाने भारताच्या गहू उत्पादनाचा (Wheat Production) अंदाज कमी केला. युएसडीएच्या मते भारतात यंदा १ हजार ८० लाख टन गहू उत्पादन होईल. उत्पादनाचा हा अंदाज केंद्राच्या १ हजार १२१ लाख टनांपेक्षा कमी आहे.

भारतात यंदा ३१९ लाख हेक्टरवर गहू लागवड (Wheat Cultivation) झाली. त्यातच लागवडीच्या काळात गहू पिकाला पोषक वातावरण होते. जमिनित ओलावाही चांगला होता. त्यामुळे केंद्र सरकारने यंदा देशातील गहू उत्पादन जास्त होईल, असा अंदाज व्यक्त केला.

केंद्र सरकारचा यंदाचा गहू उत्पादनाचा अंदाज १ हजार १२१ लाख टन आहे. नुकतेच ॲग्रीवाॅच या संस्थेनेही देशातील गहू उत्पादन १ हजार २८ लाख टनांववरच स्थिरावेल, असा अंदाज जाहीर केला होता. त्यानंतर युएसडीएनेही सरकारच्या अंदाजपेक्षा कमी उत्पादन होईल, असे म्हटले आहे.

युएसडीच्या दिल्ली येथील फाॅरेन ॲग्रीकल्चर सर्विसेस कार्यालयाने २०२३-२४ च्या वर्षात भारतात ३१९ लाख हेक्टरवर १ हजार ८० लाख टन गहू उत्पादन होईल. तर मागील हंगामात ३०५ लाख हेक्टरवर १ हजार टन उत्पादन झाले होते.

यंदा भारतात गहू पिकाला पोषक हवामान होते. त्यामुळे उत्पादकता चांगली राहीली. मागील हंगामात प्रतिहेक्टरी उत्पादकता ३.२८ टन होती. ती यंदा ३.३९ टनांपर्यंत वाढली.

पावसाचा फटका

देशातील महत्वाच्या गहू उत्पादक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने दणका दिला. त्यामुळे गहू पिकाला फटका बसला. तसेच बदलत्या वातावरणाचाही परिणाम पिकावर होत आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ झाली होती. त्याचाही परिणाम पिकावर जाणवला.

गुजरात आणि राजस्थानमध्ये फेब्रुवारीत पिकाचे नुकसान झाले. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये पाऊस झाल्याने पिकाची गुणवत्ता कमी झाली.

सरकारला दरवाढीची भीती

मागील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारतील मागणी, सरकारची कमी खरेदी आणि उत्पादनातील घट यामुळे देशात गव्हाच्या दरात मोठी तेजी आली होती. यामुळे सरकारने दर नियंमत्रणासाठी निर्यातबंदी आणि खुल्या बाजारात गहू विक्रीचा निर्णय घेताल होता.

सध्या गव्हाचे भाव नियंत्रणात आहेत. पण पावसाने वाढणारे नुकसान आणि इतर धान्यातील दरवाढीमुळे पुढील काळात गव्हाच्या दरातही वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार गव्हाच्या किमतीवर लक्ष ठेऊन आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT