Wheat Rate Update : देशातील गहू पिकाला (Wheat Crop) मागील दोन आठवड्यांमध्ये फटका बसला. त्यामुळे गहू उत्पादन ८ ते १० टक्क्यांनी कमी येऊ शकते, असे केंद्राने स्पष्ट केले.
पण तरीही यंदा देशातील गहू उत्पादन (Wheat Production) १ हजार १२२ लाख टनांवर पोचेल, असा विश्वास केंद्रीय अन्न सचिव संजिव चोप्रा यांनी सांगितले.
मागील हंगामात देशातील गहू उत्पादन १ हजार ७७ टनांवर स्थिरावले होते. त्यातच देशातून निर्यात वाढल्याने खुल्या बाजारातील दर वाढले होते. त्यामुळे सरकारला कमी खेरदी करता आली. परिणामी दरातील वाढ कायम राहीली.
यंदा देशात गव्हाचा पेरा वाढल्याने सरकारने विक्रमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. सरकारने यंदा १ हजार १२१ लाख टन गहू उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.
सरकार विक्रमी उत्पादनाचा अंदाज बाळगून असतानाच पिकाला यंदा बदलते वातारण, वाढती उष्णता आणि पावसाचा फटका बसला. यामुळे गहू उत्पादनात १० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र सरकार विक्रमी गहू उत्पादनावर ठाम आहे.
देशातील गहू उत्पादनाला फटका बसला तरी भारत १ हजार १२१ लाख टन गहू उत्पादनाचा आकडा गाठेल, असे केंद्रीय अन्न सचिव संजिव चोप्रा यांनी सांगितले.सचिव चोप्रा यांनी सांगितले की, देशातील अनेक भागातील गहू काढणी आता वेगाने सुरु झाली. भारतीय अन्न महामंडळाने अनेक राज्यांमध्ये गहू खरेदी सुरु केली.
खरेदी वाढवता यावी यासाठी सरकारने गहू खरेदीचे नियम मध्य प्रेदशात शिथिल केले. लवकरच पंजाब आणि हरियानातील नियमही शिथिल करण्यात येतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.