Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस बाजारात चढ उतार सुरुच!

Cotton Bajarbhav : कापूस बाजारात मागील आठवडाभरात सुधारणा पाहयला मिळाली होती. सलग तीन दोन महिने बाजार दबावात होता.

Anil Jadhao 

Cotton Rate Update : कापूस बाजारात मागील आठवडाभरात सुधारणा पाहयला मिळाली होती. सलग तीन दोन महिने बाजार दबावात होता. मे महिन्यात तर निचांकी भाव मिळाला होती. त्यामुळे कापूस दरातील वाढ टिकून राहील, असे वाटत होते.

पण दोन दिवसांपासून दरात पुन्हा काहीसे चढ उतार सुरु झाले. आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला.

देशातील बाजारात कापसाची आवक सध्या कमी दिसते. पण सरासरीपेक्षा आवकेचा दबाव जास्तच आहे. आजही देशातील बाजारात कापसाची ७० हजार गाठींच्या दरम्यान आवक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पण मागीवर्षी जून महिन्यातील बाजारातील आवक १५ लाख गाठींच्या दरम्यान होती.

म्हणजेच सध्याही बाजारातील कापूस आवक सरासरीपेक्षा पाचपटींनी अधिक आहे. खरिपातील लागवडी सुरु होईपर्यंत कापूस आवक सुरु राहील. कारण लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. त्यामुळे लागवडी होईपर्यंत आवकेचा दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. कापूस वायद्यांमध्ये सुधारणा दिसली. तर काॅटलूक ए इंडेक्स ९५.८५ सेंट प्रतिपाऊंडवर होता. देशातील वायदे आजही दबावात होते. आज कापूस वायदे ५९ हजार ३०० रुपयांवर आले होते. तर बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला.

दुसरीकडे बाजारातील आवकेची गती पाहता शेतकऱ्यांकडे आता खूपच कमी प्रमाणात कापूस उपलब्ध असेल, असे जाणकार सांगत आहेत. देशात यंदा २९८ लाख गाठी कापूस उत्पादन झाल्याचा अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला.

तर ५ जूनपर्यंत देशातील बाजारात २८० लाख गाठी कापूस आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. म्हणजेच आता शेतकऱ्यांकडे कमी कापूस उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील काळात कापसाची आवक कमी होत जाणार आहे.

सध्या कापूस शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. यातील काही शेतकरी लगेच कापूस विकणार नाहीत. त्यामुळे आवकेचा दबाव झपाट्याने कमी होऊ शकतो. लागवडी सुरु झाल्यानंतर शेतकरी विक्री कमी करतील, असेही शेतकरी सांगत आहेत.

त्यातच महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये यंदा माॅन्सून उशीरा दाखल होणार आहे. त्यामुळे कापूस लागवड किती होते, यावरही दर अवलंबून असतील, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT