Organic Farming Agrowon
ॲग्रोमनी

Organic Farming: श्रीलंकेतल्या चहा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती कशी आहे?

दात कोरून देशाचे पोट भरणाऱ्या श्रीलंकेतील सेंद्रिय शेतीचा (Organic Farming) फटका जास्त कशाला बसला असेल तर तो तिथल्या चहाच्या मळ्यांना (Tea Farm).

Team Agrowon

दात कोरून देशाचे पोट भरणाऱ्या श्रीलंकेतील सेंद्रिय शेतीचा (Organic Farmer) फटका जास्त कशाला बसला असेल तर तो तिथल्या चहाच्या मळ्यांना (Tea Farm). रासायनिक खतांपेक्षा (Fertilizer) सेंद्रीय खतं स्वस्त पडतील, आणि सेंद्रिय शेती केल्यास दरवर्षी परकीय चलनाची बचत होईल असं गणित मांडलेल्या सरकारमुळे श्रीलंकेतला चहा उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता.

अंगलट आलेला हा प्रयोग सुधारण्यासाठी श्रीलंकेच्या चहा उत्पादक शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतलाय. चहाच्या क्षेत्रात पूर्णपणे सेंद्रिय बनण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर, श्रीलंकेतील चहा उत्पादकांनी आता उत्पादन सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलंय. अनुकूल हवामानासोबतच रासायनिक खतांचा वापर सुरू केल्याचे परिणाम दिसायला लागले आहेत.

खतांच्या वापरामुळे चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत उत्पादनात सुधारणा दिसून येईल. आताचं हवामानदेखील चहाच्या वाढीसाठी पोषक आहे. थोडीबहुत मेहनत घेतल्यास श्रीलंकेला जागतिक बाजारपेठेतलं आपलं स्थान टिकवायला मदत होईल असं तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांच म्हणणं आहे.

श्रीलंकन टी बोर्डचे अध्यक्ष नीरज डी मेल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, सध्या ढासळलेलं चहाचं उत्पादन वाढवण्यासाठी चहाची पुनर्लावणी सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी देशातील खतावरील बंदी उठवल्याने त्यांचा वापर वाढला आहे. मात्र पिकासाठी आवश्यक तेवढ्या खतांचा आढावा घेऊन मळ्यांना त्या त्या प्रमाणात खत पुरवठा करण्यावर भर देण्यात येईल. एप्रिल आणि मेमधील पावसाचा फायदा पिकांना झाला.

सध्या श्रीलंकेत राजकीय अस्थिरता आहे. या घडामोडींमुळे चहा उत्पादकांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय, या प्रश्नावर प्रश्नावर नीरज म्हणाले की, चहाचे मळे शहरांपासून लांब आहेत. किंबहुना कोलंबोमधील बंदर शहरापासून किमान १० किमी अंतरावर आहे. त्यामुळे थेट झळ बसत नाही. परंतु आव्हाने मात्र आहेतच. परंतु चहाचे लिलाव सुरू आहेत, चहाची निर्यात होते आहे. जोपर्यंत देशात कर्फ्यू किंवा सक्तीचे लॉकडाऊन लागत नाही तोपर्यंत व्यवसाय नेहमीप्रमाणेच सुरू राहील.

श्रीलंकेत मागच्या सोमवारपासून तीन तास वीज कपात सुरू आहे. पॉवर प्लांटमध्ये अपुरे इंधन आणि आर्थिक अडचणींमुळे श्रीलंकेला अनेक महिन्यांपासून वीज, इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय. त्याचाही परिणाम चहाच्या उत्पादनावर होतोय असं स्थानिक शेतकरी सांगतात.

श्रीलंकेत या इंधन टंचाईमुळे इतर वस्तुंची निर्यात थंडावली असली तरी चहा उत्पादनाला म्हणावा तितका फटका बसला नाही. चहा निर्यातदारांनी यूएस डॉलरमध्ये पैसे देण्याचे मान्य केलं आहे. त्यामुळे इंधनाची अडचण दूर होऊन कारखाने सुरू ठेवणं शक्य झालं. सध्या जास्तीचे उत्पादन नसल्याने निर्यात यथावकाश सुरू होईल.

श्रीलंका जगातील तिसरा सर्वात मोठा चहा पुरवठादार देश आहे. मात्र सेंद्रिय शेतीच्या जीवावर उड्या मारायचा बेत आखलेल्या सरकारमुळे हे स्थान डळमळीत होताना दिसलं. मात्र श्रीलंका आहे त्या स्थानवरच राहील असं टी बोर्डचे अध्यक्ष नीरज यांना वाटतं. ते म्हणतात, "श्रीलंकेच्या स्थानात काही बदल होईल असं मला वाटत नाही. यंदाच्या वर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांत चहाच्या उत्पादन १७ टक्क्यांनी घटलं. तर निर्यातीत ७.५ टक्के घट झाली आहे."

वाढती महागाई ही चिंतेची बाब आहे. परंतु चहा कामगारांना महागाईचा फटका बसू नये यासाठी उत्पादक संस्था आणि खासगी चहा कारखाने मालक प्रयत्न करत आहेत, असं नीरज म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT