Soybean Sowing News
Soybean Sowing News Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

टीम ॲग्रोवन

अकोला ः जुलै महिन्यात पेरणीने (Kharif Sowing) वेग घेतला असून, जिल्ह्यात सोयाबीनची (Soybean Sowing) सर्वाधिक दोन लाख १९ हजार ८०९ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली. सरासरी क्षेत्राच्या १०९ टक्के ही पेरणी झाली असून, आणखी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. (Akola District Soybean Acreage)

अकोला जिल्ह्याच्या ४ लाख ५६ हजार क्षेत्रफळापैकी दोन लाख २९८०९ हेक्टरवर आतापर्यंत सोयाबीनची पेरणी झाली. यंदा कृषी विभागाच्या नियोजनानुसार दोन लाख ११८१ हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज होता. मात्र यापेक्षा अधिक पेरणी झाली. जिल्ह्यात अद्याप १० टक्के म्हणजे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या व्हायच्या आहेत. यामुळे सोयाबीनची लागवड आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या दोन हंगामांपासून सोयाबीनला चांगला दर मिळाला. शिवाय दर्जेदार उत्पादन बियाण्यांसाठी मोठ्या प्रमाणात विक्रीसुद्धा झाले. परिणामी शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे ओढा वाढला आहे.

जिल्ह्यातील पीकनिहाय पेरणी

सोयाबीन २१९८०९ हेक्टर

कपाशी ११८१९३

मूग १०१९८

उडीद ९१३४

ज्वारी १५३६

तूर ५२४२९

मका ११२

तीळ १२२

एकूण- ४११५६०

पीककर्जाचे घोडे अडलेलेच

खरीप पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. तरीही संपूर्ण शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेले नाही. हंगामासाठी १४०० कोटींचा लक्ष्यांक असून, बँकांनी गेल्या आठवड्यापर्यंत ८३९ कोटी ९६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. यात प्रामुख्‍याने जिल्हा बँकेने ४७६ कोटी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका १७९ कोटी, खासगी बँका १२ कोटी, विदर्भ कोकण ग्रामीण बँक १७१ कोटी असे ८३९ कोटी रुपयांचा वाटप झाले. एक लाख ५३ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करायचे असून त्यापैकी ८६ हजार ४०५ शेतकऱ्यांना आजवर पीककर्ज मिळाले आहे. ५६ टक्के खातेदार व ६० टक्के रक्कम वाटप झाली आहे. अजून ४० टक्के रक्कम वितरित व्हायची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT