Soybean Market  Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : सोयाबीन बाजाराला मिळू शकतो खाद्यतेल दरवाढीचा आधार

सोयापेंडचा विचार करता सोमवारी वायदे ५०० डाॅलरवर होते. ते शुक्रवारी ४९० डाॅलरवर बंद झाले.

Anil Jadhao 

Pune News : सोयाबीन दराला आत्तापर्यंत सोयापेंडकडून (Soyameal) आधार होता. पण सोयातेलाचे भाव दबावात होते. भारतात आयातही जास्त झाल्यानं दबाव जास्त होता. मात्र चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलाचे भाव सुधारले.

त्यातच देशातून सोयापेंड निर्यात (Soyameal Export) वाढली आहे. त्यामुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

चालू आठवड्याचा विचार करता सोयाबीन (Soybean) आणि सोयापेंडचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात नरमले. सोमवारी सोयाबीनचे वायदे १५.४४ सेंट प्रतिपाऊंडवर सुरु झाले होते. रुपयात हा दर जवळपास ४ हजार ७०० रुपये होतो.

तर शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १५.२७ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले. म्हणजेच ४ हजार ६४० रुपयांवर आठवड्याचा बाजार बंद झाला. याचाच अर्थात असा की सोयाबीन वायद्यांमध्ये ७० रुपयांची नरमाई आली.

सोयापेंडचा विचार करता सोमवारी वायदे ५०० डाॅलरवर होते. ते शुक्रवारी ४९० डाॅलरवर बंद झाले. म्हणजेच या आठवड्यात सोयापेंडचे वायदे १० डाॅलरने नरमले.

सोयातेलाचे दर मात्र या आठवड्यात वाढले. सोमवारी सोयातेलाचे वायदे ६०.४७ सेंट प्रतिपाऊंडवर होते ते शुक्रवारी ६१.४८ सेंटवर पोचले. इंडोनेशियाने सोयातेल निर्यातवर काही निर्बंध आणले आहेत. त्यामुळं पामतेलच्या दरात सुधारणा झाली.

पामतेलाने ४ हजार रिंगीट प्रतिटनाचा टप्पा पार केला. परिणामी सोयातेलालाही आधार मिळाला.

देशातील दरपातळी

देशातील सोयाबीन बाजारासाठी हा आठवडा मात्र तेवढा आशादायक नव्हता. सोयाबीनची बाजारातील आवक स्थिर असूनही दर वाढले नाहीत. देशातून सोयापेंड निर्यात वाढल्यानं दरवाढीची अपेक्षा होती.

पण आठवडाभर दरपातळी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहिली. म्हणजेच चालू आठवड्यात बाजार समित्यांमधील दरात वाढ जाणवली नाही.

सोयातेलाचे दरवाढीची शक्यता

देशातून सध्या सोयापेंडची निर्यात वेगाने सुरु आहे. भारतीय सोयापेंडला मागणी टिकून आहे. आता खाद्यतेलाचेही दर वाढले. परिणामी सोयातेलाच्याही दरात सुधारणा दिसून आली.

म्हणजेच पुढील आठवड्यात पामतेल आणि सोयातेलाच्या दरात आणखी वाढ दिसू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. असं झाल्यास सोयाबीन बाजारालाही आधार मिळू शकतो, अशा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT