soybean market agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : ब्राझीलमधील सोयाबीन काढणी अडखळत; अमेरिकेला फायदा

जगातील सर्वात मोठ्या सोयाबीन उत्पादक ब्राझीलमध्ये पावसामुळे पीक काढणीत अडथळे येत आहेत. त्यामुळे ब्राझीलमधील सोयाबीन काढणी गेल्यावर्षीपेक्षा धीम्या गतीने होत आहे. याचा फायदा अमेरिकेच्या सोयाबीनला होत आहे.

Team Agrowon

पुणेः जगातील सर्वात मोठ्या सोयाबीन उत्पादक (Soybean Producer) ब्राझीलमध्ये पावसामुळे पीक काढणीत अडथळे येत आहेत.

त्यामुळे ब्राझीलमधील सोयाबीन काढणी (Soybean Harvesting) गेल्यावर्षीपेक्षा धीम्या गतीने होत आहे. याचा फायदा अमेरिकेच्या सोयाबीनला होत आहे.

ब्राझीलचं सोयाबीन उशीरा येत असल्याने अमेरिकेतून सोयाबीन निर्यात (Soybean Export) वाढली आहे.

जगात सोयाबीन उत्पादनात मागील पाच वर्षांपर्यंत अमेरिका आघाडीवर होती. पण ब्राझीलमध्ये सोयाबीन लागवड वाढली.

त्यामुळे ब्राझीलने अमेरिकेला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. सध्या ब्राझील सोयाबीन उत्पादनात आघाडीवर आहे. तर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अमेरिकेतील सोयाबीन पिकाला यंदा कमी पावसाचा फटका बसला होता. त्यामुळं अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा घटलं. यंदा अमेरिकेतील उत्पादन १ हजार १६३ लाख टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

ब्राझीलमधील सोयाबीन काढणी जानेवारीच्या मध्यापासून सुरु होते. पण मागील काही दिवसांपासून ब्राझीलमधल्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये पाऊस पडत आहे.

त्यामुळे सोयाबीन काढणीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. ब्राझीलमध्ये आत्तापर्यंत केवळ ९ टक्के सोयाबीन काढणी पूर्ण झाली.

मात्र मागील हंगामात याच काळातील सोयाबीन काढणी २० टक्क्यांच्या दरम्यान पूर्ण झाली होती.

ब्राझीलच्या उत्पादनाचा अंदाज
यंदा ब्राझीलमध्ये सोयाबीन पिकाला पोषक स्थिती होती. त्यामुळं पेरा वाढला होता. तर पिकाची स्थिती चांगली असल्याने विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे.

सुरुवातीला ब्राझीलचं उत्पादन १ हजार ५५० लाख टनांच्या दरम्यान राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण नंतरच्या काळात उत्पादनाचा अंदाज १ हजार ५३० लाख टनांपर्यंत कमी करण्यात आला.

अमेरिकेतून निर्यात वाढली
ब्राझीलमध्ये यंदा उत्पादनवाढीचा अंदाज असला तरी सोयाबीन काढणीच्या कामात पावसाचा अडथळा येत आहे. त्यामुळे सोयाबीन काढणीचा वेग मंदावला.

परिणामी शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीही कमी झाली आहे. याचा फायदा अमेरिकेला होत आहे. ब्राझीलमधील सोयाबीनची काढणी वेगात येण्यास काही काळा लागेल.

मागील आठवड्यात अमेरिकेने १९ लाख टन सोयाबीन निर्यात केली. तर जानेवारी महिन्यात अमेरिकेतून ८२ लाख टन सोयाबीन निर्यात झाली.

मागील हंगामात याच काळातील निर्यात ६५ लाख टनांच्या दरम्यान होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत मंजूर; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपये वाटण्यास मान्यता

Wild Vegetable Festival : नैसर्गिक रानभाजी महोत्सवाने पेसा गावात निसर्गाचा सन्मान

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

SCROLL FOR NEXT