Paddy Agrowon
ॲग्रोमनी

तेलंगणातल्या तांदूळ उत्पादकांना अखेर दिलासा!

रब्बीतील तांदळाची खरेदी होणार की नाही, याबाबतच्या अनिश्चीततेमुळे तांदूळ उत्पादकही (Paddy Growers) धास्तावले होते. मात्र अखेर केंद्र सरकारने राज्यातील रब्बी हंगामातल्या ४०.२० लाख टन तांदळाची हमीभावाने (MSP) खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. तसा निर्णयही केंद्राने जाहीर केला आहे.

Team Agrowon

केंद्र सरकारने तेलंगणातील रब्बी हंगामातील ४०.२० लाख टन तांदळाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रब्बीतल्या तांदळाच्या हमीभावाने (MSP) खरेदीबाबतचा तांदूळ उत्पादकांचा संभ्रम संपुष्टात आला आहे.

केंद्र सरकारकडून राज्यातील रब्बी हंगामातल्या भातपिकाची (Paddy Procurement) खरेदी करण्यात यावी, यासाठी तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने (TRS) केंद्र सरकारशी थेट संघर्षाचा पवित्रा घेतला होता. सातत्याने पाठपुरावा करूनही केंद्र सरकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने टीआरएसकडून राजधानी दिल्लीतही शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

रब्बीतील तांदळाची खरेदी होणार की नाही, याबाबतच्या अनिश्चीततेमुळे तांदूळ उत्पादकही (Paddy Growers) धास्तावले होते. मात्र अखेर केंद्र सरकारने राज्यातील रब्बी हंगामातल्या ४०.२० लाख टन तांदळाची हमीभावाने (MSP) खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. तसा निर्णयही केंद्राने जाहीर केला आहे. मात्र आपण तेलंगणाकडून कच्चा तांदूळ अथवा फोर्टिफाईड राईस खरेदी करणार असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने अनेकवेळा तेलंगणाकडून कच्चा तांदूळ खरेदी करण्यात काहीच अडचण नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. केवळ परबॉइल्ड राईस खरेदी करण्यास केंद्राचा विरोध राहिलेला आहे.

टोकाचा संघर्ष करूनही केंद्र सरकारकडून नरमाईची भूमिका घेतली जात नसल्याने अखेर तेलंगणा सरकारनेच परबॉइल्ड राईस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय आपण कच्चा तांदूळ पुरविण्यास तयार असल्याचे पत्रही राज्य सरकारकडून केंद्राला पाठवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सप्टेंबर २०२२ पर्यंत आपण रब्बीतला तांदूळ खरेदी करणार असल्याची ग्वाही तेलंगणा सरकारला दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT