MSP Agrowon
ॲग्रोमनी

Put Option : शेतकऱ्यांना हमीभावाचा एक मार्ग म्हणजे पूट ऑप्शन : रास्ते

Farmer producer production : शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये एनसीडीईएक्सच्या पूट ऑप्शनविषयी जागृती व्हावी आणि त्यांचा सहभाव वाढावा यासाठी लोनची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.

Team Agrowon

Farmer Update News : शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये एनसीडीईएक्सच्या पूट ऑप्शनविषयी जागृती व्हावी आणि त्यांचा सहभाव वाढावा यासाठी लोनची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्यासाठी नाबार्ड आणि सरकारशी बोलणे सुरु आहे, असे द नॅशनल कमोडिटीज अॅन्ड डेरिव्हेटीव्हज एक्सचेंज अर्थात एनसीडीईक्सचे कार्यकारी संचालक अरूण रास्ते यांनी सांगितले.

अरून रास्ते हे येथे आयोजित शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या परिषदेत बोलत होते. रास्ते म्हणाले की, पूट ऑप्शन हे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी फायद्याचे आहे.

पूट ऑप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी ४ ते ५ टक्के प्रिमियम भरावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी होऊ शकत नाहीत. तसेच आपल्या संचालक मंडळाची सहमती मिळवताना अडचणी येतात.

पूट ऑप्शनबाबात जागरुकताही कमी आहे. पूट ऑप्शनमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांना लोनची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार सूरु आहे.

विमा हे बाजारातील आर्थिक धोक्यांचे समायोजन करण्याचे एक शस्त्र आहे, असे श्री रास्ते यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पूट ऑप्शन हा एक चांगला पर्याय आहे.

सध्या एनसीडीएक्सवर डेरिव्हीटीज ट्रेडसाठी ५०० शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी १७० कंपन्या काम करत आहेत. यापैकी ४१ कंपन्यांना पूट ऑप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सेबीच्या साह्याने मदत केली होती. त्यातील तीन कंपन्या आता स्वतः ट्रेड करत आहेत.

हमीभावापेक्षा पूट ऑप्शन हा पिकांसाठी विम्याचा चांगला पर्याय होऊ शकतो. आपल्याकडे सध्या पीक विमा आहे. पण किंमत विमा आहे. हमीभावाला पर्याय म्हणून पूट ऑप्शन काम करु शकते, असेही रास्ते यांनी सांगितले. यातून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात माल विकण्याची वेळ येणार नाही. तसेच जास्तीत जास्त मालाला हमीभाव मिळू शकतो, असेही रास्ते म्हणाले.

शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा एक मार्ग म्हणून सरकारने पूट ऑप्शनकडे पाहावे, असेही रास्ते म्हणले. पूट ऑप्शनसाठी प्रिमियमवर अनुदान देण्यासाठी एक धोरण असावं. विशेषतः शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येईल.

आंध्र प्रदेश अनुदान देणार

शेतकऱ्यांना प्रिमियमसाठी अनुदान दिल्यास शेतकरी पूट ऑप्शनमध्ये जास्तीत जास्त सहभागी होतील. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. आंध्र प्रदेश लवकरच राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना पूट ऑप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रिमियमवर अनुदान देणार आहे.

तसेच एनसीडीएक्सवर विमानाचे इंधन, दूध, सफरचंद आणि हवामान याचा ट्रेंड सुरु होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला, अशी माहिती रास्ते यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT