Chana Market
Chana Market  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Market : नाफेडची हरभरा खरेदी वाढूनही दर दबावातच

Team Agrowon

Chana Rate : बाजारात हरभरा आवक (Chana Rate) सुरु होऊन दीड महिन्यांचा कालावधी होत आला. पण हंगामाच्या सुरुवातीपासूनच हरभरा दर दबावात आहेत. दुसरीकडे नाफेडची खरेदीही वेगाने सुरु आहे. नाफेडची खरेदी वाढल्यानंतरही दरात सुधारणा दिसली नाही. पण नाफेडकडील साठा वाढत असल्यानं बाजाराची तिकडेही नजर आहे.

तुरीप्रमाणं यंदा हरभऱ्याच्याही दरात तेजी येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण गेले वर्षभराचा ट्रेंड हरभऱ्याने कायम ठेवला. मागील हंगामात सरकारच्या विक्रीमुळे हरभरा बाजाराभाव दबावात राहिले. यंदा तूर, मूग आणि उडदाचे भाव तेजीत आहेत.

उत्पादन घटल्याचा परिणाम बाजारावर झाला. पण हरभऱ्याचे यंदा विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. पण शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा उत्पादकता कमी राहीली. यंदा उत्पादन किमान २० टक्क्यांपर्यंत कमी आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांनीही याला पुष्टी दिली. पण बाजारात याचा प्रभाव दिसत नाही.

हरभऱ्याला बाजारात आजही सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ९५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सरकारनं यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ३३५ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. पण बाजारातील दरानं हा टप्पा अद्यापही गाठला नाही.

हरभरा दरात किंचित चढ उतार दिसत असले तरी मोठी वाढ नाही. वास्तविक पाहता यंदा उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा होती. तूर आणि उडदाच्या दरानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला. पण हरभऱ्यामध्ये आतापर्यंत निराशाच दिसली.

खुल्या बाजारात हरभरा दर दबावात असले तरी नाफेडच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळताना दिसतोय. नाफेडने देशभरात आतापर्यंत १४ लाख ९० हजार टन हरभरा खरेदी केला. आठ राज्यांतील ६ लाख ८५ हजार शेतकऱ्यांकडून नाफेडने ही खरेदी केली. यापैकी महाराष्ट्रात ५ लाख ६७ हजार टनांची खरेदी झाली. तर मध्य प्रदेशात ४ लाख ४६ हजार टन आणि गुजरातमध्ये २ लाख ६३ हजार टनांची खरेदी केली.

नाफेडची खरेदी आता १५ लाख टनांच्या घरात पोचली. तर मागील हंगामातील साठा जवळपास एवढाच आहे. म्हणजेच सरकारकडे ३० लाख टनांचा स्टाॅक तयार झाला. नाफेडची खरेदी अजूनही सुरुच आहे. त्यामुळं यंदाही नाफेडची खरेदी चांगली होण्याची शक्यता आहे.

शेतकरीही नाफेडला हरभरा विकण्यासाठी वाट पाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी हरभरा मागं ठेवलाय. नोंदणी केलेले शेतकरी खुल्या बाजारात हरभरा विकताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांनी ठेवलेला स्टाॅक आणि बाजारातील कमी दर यामुळं नाफेडला पुढील काळातही हरभरा मिळेल.

नाफेडची खरेदी वाढत असल्यामुळे पुढील काळात खुल्या बाजारतील दराला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केला जाते. खुल्या बाजारातील दर हमीभावाचाही टप्पा गाठू शकतात, अशा अंदाज आहे.

पण बाजारात सरकारच्या हरभरा विक्रीची भीती कायम राहील. कारण गेल्या हंगामात सरकारने सतत विक्री करून दर दबावात ठेवले होते. त्यामुळं सरकारच्या विक्रीवर बाजाराचं लक्ष असेल, असंही जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT