Onion Rate Agrowon
ॲग्रोमनी

Onion Rate : लासलगावमध्ये कांदा व्यापाऱ्यांची आडमुठी भूमिका, कांदाचे कवडीमोल भावाने लिलाव

Onion Market : नाशिकमध्ये कांदा लिलावावरून शेतकरी संतप्त झाल्याचे पहायला मिळत आहे. एकीकडे तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या कांद्याला १८०० ते २ हजार रुपये भाव दिला.

Team Agrowon

Nashik Onion Rate : नाशिकमध्ये कांदा लिलावावरून शेतकरी संतप्त झाल्याचे पहायला मिळत आहे. एकीकडे तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या कांद्याला १८०० ते २ हजार रुपये भाव दिला. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील बाजारसमित्यांमध्ये २०० ते ४०० रुपये भाव मिळत असल्याने नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला आहे.

दरम्यान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे कांद्याच्या लिलाव झाला. या लिलावात दोनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी संताप व्यक्त केला आहे.

संतप्त शेतकऱ्यांनी एक तासाहून अधिक वेळ कांद्याचे लिलाव बंद पाडल्याने काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झाले होते. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवार विंचूर या ठिकाणी आज (ता.१५) सकाळच्या सत्रात काही वाहनांचे लिलाव जाहीर करण्यात आले.

या लिलावात काल बुधवारच्या तुलनेत आज तीनशे चारशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान याप्रकरणी बाजारसमितीमधील प्रशासनावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी काही वाहनांचे फेर लिलाव झाले. मात्र फेर लिलाव एकदा होऊन द्या, या तोडग्यावर फेर लिलावामध्ये दोनशे रुपये विक्री झालेल्या कांद्याला 300 रुपये तर तीनशे ते चारशे रुपये विक्री झालेल्या कांद्याला कांद्याला पाचशे ते सहाशे रुपये इतका बाजार भाव देण्याचा तोडगा निघाला.

परंतु बाजार समितीतील प्रशासन तेथून जाताच पुन्हा व्यापाऱ्यांनी अशीच अडमुठी भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले.

लासलगावचे उपबाजार विंचूर येथे कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.

दरम्यान कांद्याला ६० ते ७० हजार रुपये एकरी खर्च येत असल्याने आज मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्च तर सोडा वाहतूक आणि मजुरी निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कापसाचा वाढलेला भाव टिकून; हरभरा आवक वाढली, तूर दबावातच, सरकीचे दर टिकून तर पपईला मागणी

Weather Update in Maharashtra : मराठवाड्यात गारपीटीचा इशारा; कोकण, मध्यम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा अंदाज

Agriculture Ai: ‘एआय’ तंत्रज्ञानातून कमी खर्चात सुरू उसाचे एकरी १०४ टन उत्पादन

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग बदलण्याचे श्रेय शेतकरी संघर्ष समितीला

Honoring Women Farmers: सन्मान महिलाशक्तीचा...

SCROLL FOR NEXT