Onion Market Update : हमीभावामुळे सहा ट्रक कांदा विक्रीसाठी तेलंगाणात रवाना

Onion Bajarbhav : कांद्याला तेलंगणाने दिली भावाची हमी अन् महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले पाणी झाले कमी’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
Onion Rate
Onion RateAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Onion News : ‘कांद्याला तेलंगणाने दिली भावाची हमी अन् महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले पाणी झाले कमी’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणा राज्यातील हैदराबाद बाजार समितीत १७०० ते २००० हजार भाव मिळणार असल्याने दोन दिवसांत कन्नड तालुक्यातून ६ ट्रक भरून तब्बल १ हजार ५०० क्विंटल कांदा ट्रकमधून रवाना झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Onion Rate
Onion Storage By FPO : हमीभावाने कांदा खरेदीपूर्वीच ‘एफपीओं’ कडून कांद्याची साठेबाजी

शेतकऱ्यांनी रात्री-अपरात्री पाणी भरुन ४० ते ६० हजार रुपये खर्च करून पिकविलेल्या कांद्याला महाराष्ट्रात प्रतवारीनुसार ३०० ते १२०० रुपये भाव मिळत आहे. यातून कांदा काढणीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

‘बीआरएस’मध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जिल्ह्यातील कांद्याच्या प्रश्नाबाबत धुळे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत आवाज उठविला होता.

आंदोलना दरम्यान तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी जाधव यांनी थेट दूरध्वनीवरून चर्चा केली. यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा खरेदी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री केसीआर यांनी दिले होते.

या आश्वासनाची पुर्तता करायची म्हणून हैदराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक एम. रविकांत यांच्यासह मोठमोठे कांदा व्यापारी महाराष्ट्रात पाठवले. त्यांनी कांद्याला १७०० ते २००० रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी हैदराबादला कांदा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीआरएसचे हर्षवर्धन जाधव यांच्या माध्यमातून दोन दिवसात ६ ट्रकमधून १ हजार ५०० क्विंटल कांदा हैदराबाद बाजार समितीत पाठविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com