चालू ऊस गाळप हंगामात महाराष्ट्राने विक्रमी १३२ लाख टन साखर उत्पादनाची नोंद केली आहे, असा दावा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांनी केला आहे. मात्र, जादा उत्पादन होवूनही साखरेचे दर (Sugar Price) खाली येण्याची शक्यता कमीच असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. अतिरिक्त उत्पादनाशी (Excess Sugar Production) संबंधित समस्या आणि परिस्थिती हाताळण्यासाठी पावले उचलली जात असल्याचेही ते म्हणाले.
चालू हंगामात राज्यात एक हजार १८७ लाख टन उसाचे गाळप झाले असून बहुतांशी भागात अजूनही सुमारे ९० लाख टन उसाचे गाळपासाठी शिल्लक आहे. यामध्ये मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाच्या प्रतिक्षेत आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
विक्रमी साखर उत्पादन -
''महाराष्ट्राने याआधी २०१९-२० या हंगामात सर्वाधिक १०७ लाख टन साखर उत्पादनाची (Maharashtra Sugar Production) नोंद केली होती. यावर्षी ते जवळपास १३२ लाख टनांवर पोहोचले आहे, तर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Sugar Production) यावर्षी ८० लाख टन साखर उत्पादन झाले आहे,'' गायकवाड यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील विविध कंपन्यांनी १३० ते १४० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनातून (Ethanol Production) ९-१० हजार कोटी मिळविल्याचा दावाही गायकवाड यांनी केला आहे.
गाळप हंगाम लांबणार -
साधरणणे राज्यातील ऊस गाळप हंगाम (Sugarcane Crushing season) हा १२० ते १४० दिवस किंवा जास्तीत जास्त १४५ दिवसांपर्यंत चालतो. मात्र, यावर्षी उसाचे उत्पादन (Excess Sugarcane Production )मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे २० कारखान्यांचा गाळप हंगाम १६० दिवसांपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास ९० लाख टन ऊस गाळपाविना शेतात उभा आहे. ज्यामध्ये एकट्या मराठवाड्यात ६० लाख टन ऊस आहे. ३१ मे पर्यंत मराठवाड्यातील उसाचे गाळप (Marathawada Sugarcane Crushing) होईल, अशी आम्हीला अपेक्षा आहे, तर सोलापुर जिल्ह्यातील कारखान्यांनी मराठवाड्यातून २० हजार टन ऊस गाळपासाठी उचलल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.
हार्वेस्टरची यादी सोपवली -
बीडमध्ये मोठ्या प्रमाणात उसतोड मजुरांची (sugarcane cutting laborer) उलबध्ता असल्याने उसाने भरलेल्या वाहनांची कारखान्यांबाहेर गर्दी वाढली आहे. याउलट जालन्यातील चित्र वेगळे आहे. जालन्यात मजुरांच्या टंचाईमुळे उसतोडणीवर परिणाम झाला आहे. परिणामी कारखान्यांना गाळपासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गाळप पूर्ण झालेल्या कारखान्यांचे हार्वेस्टर ताब्यात घेण्याचे आदेश साखर आयुक्तांना दिले आहेत. ताब्यात घेतलेले हार्वेस्टर गाळप सुरू असणाऱ्या कारखान्यांना भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे.
''आम्ही मराठवाड्यातील कारखान्यांना हार्वेस्टरची यादी सोपवली असून शेतात उभ्या असलेल्या उसाच्या तोडणीबाबत त्यांच्याशी चर्चा करत आहोत, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
ऊस तोडणी, वाहतुकीसाठी जादा पैशाची मागणी -
ज्या शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शेतात उभा आहे, अशा शेतकऱ्यांकडून उसतोड आणि वाहतुकीसाठी जादा पैसे मागितले जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तशा तक्रारी केल्या आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याने कारखान्याला ऊस वाहतुकीसाठी जादा पैसे दिले असतील, तर तो शेतकरी आम्हाला लेखी तक्रार देऊ शकतो. माझ्याकडे आतापर्यंत अशा ७५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांकडून घेतलेली जादा रक्कम संबंधिताकडून वसूल करून ती शेतकऱ्याला परत दिली जाईल, असे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.