Ajit Pawar News : दुधाचे दर वाढल्याने गायींच्या किमतीही वाढल्या - उपमुख्यमंत्री अजित पवार

Milk Rate : दुधाचे दर वाढल्याने गाईंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून देशी गायी, म्हशींसाठी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar News Agrowon
Published on
Updated on

Pune News- दुधाचे दर वाढल्याने गाईंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून देशी गायी, म्हशींसाठी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवारातील सुपर स्पेशिअॅलिटी पशुवैद्यकीय दवाखानाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता.८) झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Ajit Pawar News
चार गायी विकून मी चार एकर शेती घेतली, पण...

पुणे परिसरातील वाढते नागरिकीकरण आणि नागरिकांचा पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या आजाराचे वेळेत निदान करणे. तसेच चांगली सेवा देत पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे पवार म्हणाले.

Ajit Pawar News
'त्या' साखर कारखान्यांचे हार्वेस्टर ताब्यात घ्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे साखर आयुक्तांना आदेश

पशुसंवर्धन महोत्सवासाठी निधी -

यावेळी पवार म्हणाले की, शेळी समूह केंद्र अमरावती जिल्ह्यात उभारण्यात येत आहे. मासळी केंद्र देखभालीसाठी रुपये ५० कोटी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पशुसंवर्धन महोत्सवासाठी ४०६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या आजारांचे (झुनोटिक रोग) प्रमाण वाढत आहे. हे आजार टाळणे आणि वेळीच निदान करण्याबरोबरच पशुपालकांना आवश्यक सविस्तर मार्गदर्शन करणे ही आज काळाची गरज आहे. ही जबाबदारी या संस्थेद्वारे पार पाडण्यात येणार आहे. राज्यातील एकमेव पशुवैद्यकीय दवाखाना असल्याने याचा फायदा राज्यासह जिल्ह्यातील पशुधनाला आणि पयार्याने पशुपालक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

गायी आणि बैलांच्या किमती वाढल्या -

बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यास परवानगी दिल्यामुळे बैलांच्या किमती वाढल्या आहेत. दुधाचे दर वाढल्याने गाईंच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होत असून देशी गायी, म्हशींसाठी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.

येत्या काळात सर्व विभागात आवश्यक पदभरती करण्यास वित्त विभागातर्फे परवानगी देण्यात येणार आहे. विकासकामे करताना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

या प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन आयुक्त सचिनद्र प्रताप सिंग, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com