Soybean Rate
Soybean Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Rate : सोयाबीनचं नुकसान; दर वाढले का?

Anil Jadhao 

मागील आठवडाभरापासून देशातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक (Soybean Producer) भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. यामुळं सोयाबीनचं नुकसान (Soybean Crop Damage) होतंय. काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान होत असल्यानं उत्पादनही घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण नेमकं कोणत्या राज्यांमध्ये सोयाबीनचं नुकसान होतंय? सोयाबीन नुकसानीचा दरावर काही परिणाम होतो का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

कापूस दर टिकून

देशातील अनेक कापूस उत्पादक राज्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळं कापसाचं नुकसान वाढलंय. मागील आठवडाभरात कापूस वेचणीच्या कामात अडथळे येत आहेत. तसचं वाहतुकही अडचणीची ठरत आहे. परिणामी शेतकऱ्यांना कापूस विक्री करणं अवघड जातयं. पावसामुळं बाजारातील कापूस आवकेलाही काहीसा ब्रेक लागलाय. सध्या देशभरातील बाजारांमध्ये कापसाला सरासरी ७ हजार ५०० ते १० हजार रुपये दर मिळतोय. हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

तूर दरातील तेजी कायम

देशात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीची आधीच टंचाई जाणवत असताना सणांमुळं मागणी वाढली आहे. देशातील मागणीमुळं तुरीची आयातही काहीशी अधिक दिसते. सप्टेंबर महिन्यात जवळपास ३० हजार टन तूर आयात झाली. तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ३ हजार टन तूर देशात आली. मात्र आयात तूरही महाग पडतेय. तर देशात तुरीला सध्या ७ हजार ते ८ हजार ४०० रुपये दर मिळतोय. तुरीचे हे दर दीड महिना टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय. 

तांदळाचा साठा घटला

देशात सध्या तांदळाचेही दर तेजीत आहेत. देशातून यंदा तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणात झाली. तसचं उत्पादनही कमी राहीलं. त्यातच सोयापेंड आणि मक्याचे दर तेजीत असल्यानं देशात तुकडा तसचं अख्या तांदळाचा वापर पशुखाद्यात वाढला होता. त्यामुळं तांदाळाचा शिल्लक साठा घटलाय. मागीलवर्षी  १ ऑक्टोबरला नाफेडकडे तांदळाचा शिल्लक साठा २५३ लाख टनांवर होता. तो यंदा २०६ लाख टनांपर्यंत घटलाय. त्यामुळं सध्या तांदळाला २ हजार १०० ते २ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळतोय. तांदळाचे हे दर पुढील काही महिने टिकून राहतील, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

हरभरा दर दबावातच

दसरा आणि दिवाळीच्या काळात हरभऱ्याला मागणी वाढून दर सुधारतील असा अंदाज होता. मात्र यंदा खुल्या बाजारातील मागणी सुस्तच राहीली. परिणामी दरही दबावात आहेत. सध्या हरभरा आवकेचा हंगाम नाही. मागील आठड्यापासून दरात काही ठिकाणी जराशी सुधारणा झाली. तरीही हरभरा हमीभावापेक्षा सरासरी ८०० रुपयांनी स्वस्त विकला जातोय. सध्या हरभऱ्याला ४ हजार २०० ते ५ हजार रुपये सरासरी दर मिळतोय. हरभरा दरात फार मोठ्या तेजीची शक्यता दिसत नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

देशातील मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये सोयाबीन पीक काढणीला आलंय. मात्र गेल्या ७ ते ८ दिवसांपासून या तीनही राज्यांतील सोयाबीन उत्पादक पट्ट्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळं काढणीला आलेल्या सोयाबीनचं आणि शेतात काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. मध्य प्रदेश सोयाबीन उत्पादनात देशात अव्वल आहे. सध्या मध्य प्रदेशातच नुकसान जास्त आहे. त्यामुळं मध्य प्रदेशबरोबरच महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही सोयाबीन उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील सोयाबीन बाजारात काहीशी सुधारणा पाहायला मिळाल्याचं येथील जाणकारांनी सांगितलं. मध्य प्रदेशातील सोयाबीनचा बाजार मागील आठवड्यात ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होता. त्यात आता १०० रुपयांची सुधारणा झाल्याचं बाजारदरावरून स्पष्ट होतं. देशातील सोयाबीनचा बाजारही पीक नुकसानीमुळं मजबूत स्थितीत असल्याचं जाणकार सांगतात. सोयाबीनचं नक्की किती नुकसान झालं हे लगेच सांगता येणार नाही, मात्र उत्पादनाचा अंदाज चुकणार हे मात्र नक्की. त्यामुळं सोयाबीनचा बाजारही याकडे लक्ष ठेऊन आहे. देशभरातील बाजारात सोयाबीनला सध्या ४ हजार ३०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळतोय. मात्र पुढील काही दिवस शेतकऱ्यांनी किमान ५ हजारांचा दर लक्षात ठेऊन सोयाबीन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’ म्हणजेच खासगीकरणाकडे वाटचाल

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या ‘सोन्या’चे दर कधी वाढणार?

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

Sugar Industry : ‘डीएसटीए’कडून आज चर्चासत्राचे आयोजन

Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT