Jowar  Agrowon
ॲग्रोमनी

Jowar : देशाची भूक भागवणारी ज्वारी मागे कशी पडली?

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारताचे मुख्य धान्य ज्वारी होते. ९० च्या दशकात देशातील ज्वारी उत्पादन विक्रमी टप्प्यावर पोचले होते.

Anil Jadhao 


अनिल जाधव
पुणेः भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारताचे मुख्य धान्य ज्वारी (Jowar) होते. ९० च्या दशकात देशातील ज्वारी उत्पादन विक्रमी टप्प्यावर पोचले होते. मात्र त्यानंतर ज्वारीच्या उत्पादनाला उतरती कळा लागली ती कायम राहीली. सध्या देशात केवळ ४४ टक्केच उत्पादन होत आहे.

जगात मानवी आहार, पशुखाद्यासोबत उद्योगातही ज्वारीचा वापर वाढला आहे. आफ्रिका आणि आशियातील देशांमध्ये मानवी आहारातील वापर जास्त आहे. तर चीन, अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्ये ज्वारीचा वापर पशुखाद्यात जास्त होतो. तसेच अमेरिका, ब्राझील, अर्जेंटीना आणि इतर विकसित देशांमध्ये जैव इंधनासाठी ज्वारी वापरली जाते. जागतीक ज्वारी वापराचा विचार करता चीनचा प्रथम क्रमांक लागतो.

चीनमध्ये मागील हंगामात सर्वाधिक १०८ लाख टन वापर झाला. त्यानंतर नायजेरियात ६८ लाख टन ज्वारी वापरली गेली. मात्र चीनमध्ये पशुखद्यात जास्त वापर झाला तर नायजेरियात मानवी वापर जास्त होता. तर भारतात ४४.५ लाख टन ज्वारीचा वापर झाला. ज्वारी वापरात भारत सहाव्या स्थानावर आहे. तर भारतात मानवी आहारातच जास्त वापर होतो.

स्वतंत्र भारतात ज्वारी हेच मुख्य धान्य पीक होते. देशात ज्वारीचा पेराही जास्त होता. १९६० मध्ये भारतातील ज्वारी उत्पादन ९८ लाख १४ हजार टन ज्वारी उत्पादन झाले होते. देशातील ज्वारी उत्पादनाने १९८९ साली विक्रमी टप्पा गाठला होता. या वर्षात भारताने १२९ लाख टन ज्वारी उत्पादन घेतले होते. ते १९९२ मध्ये १२८ लाख टनांवर पोचले. त्यानंतर उत्पादन सतत घटत गेले. १९९६ मध्ये ज्वारी उत्पादन १०९ लाख टनांपर्यंत घसरले. त्यानंतर सतत घटच होत गेली. २००७ साली ७९ लाख टन आणि मागीलवर्षी ४४ लाख टनांवर उत्पादन लुटकले. म्हणजेच १९८९ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये ज्वारी उत्पादनात ५६ टक्क्यांनी घट झाली.


देशातील वापर घटला
ज्वारी उत्पादनाबरोबरच देशातील ज्वारीचा वापरही कमी होत गेला. हरित क्रांतीनंतर देशात गहू आणि भात हे मुख्य अन्नधान्य बनले. आहारातील ज्वारीचा वापर कमी होत गेला.  भारतात १९६० साली ९४ लाख ज्वारीचा वापर झाला होता. तो १९८९ मध्ये १२७ लाख टनांपर्यंत वाढला. मात्र नंतरच्या काळात ज्वारीचा वापर कमी होत गेला. गेल्या हंगामातील ज्वारीचा वापर ४४ लाख ५० हजार टनांपर्यंत घसरला. १९८९ मधील ज्वारी वापराशी तुलना करता वापर ६५ टक्क्यांनी कमी झालेला दिसतो. 


कोणत्या राज्यात जास्त उत्पादन
देशात ज्वारी उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून जवळपास ३० ते ३५ टक्के उत्पादन होतं. मात्र मागील हंगामात महाराष्ट्राने देशातील ४२ टक्के उत्पादन घेतलं. महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान आणि आंध्र प्रदेशात रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा जास्त असतो. मागील हंगामात कर्नाटकने २३.८० टक्के उत्पादन घेतले. तर तमिळनाडूत १२.३८ टक्के आणि राजस्थानमध्ये १०.८३ टक्के उत्पादन झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT