Cotton Rate Agrowon
ॲग्रोमनी

Cotton, Chana Rate : कापूस, हरभरा, हळद व कांद्याची वाढती आवक

महाराष्ट्रात सोलापूर, नगर, पिंपळगाव, नांदगाव व लासलगाव या बाजार समितीत ती सर्वाधिक होती. आवकेतील हा कल या सप्ताहात सुद्धा दिसून येत आहे.

डॉ. अरुण कुलकर्णी

फ्युचर्स किमतीः सप्ताह- १८ ते २४ मार्च २०२३

कापसाची आवक (Cotton Arrival) वाढत्या पातळीवर स्थिर आहे. हरभरा (Chana) व हळद (Turmeric) यांची आवक वाढत आहे. मका व सोयाबीन यांची आवक कमी होत आहे. कांद्याची आवक विक्रमी पातळीवर पोचली आहे.

१७ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात ती ४,८०,००० टन होती. ती मागील सप्ताहापेक्षा ३५ टक्क्यांनी अधिक होती. या एकूण आवकेत महाराष्ट्रातील आवक ५० टक्क्याहून अधिक होती; त्या खालोखाल गुजरात (१७ टक्के) व उत्तर प्रदेश (१२ टक्के) या राज्यातील आवक होती.

महाराष्ट्रात सोलापूर, नगर, पिंपळगाव, नांदगाव व लासलगाव या बाजार समितीत ती सर्वाधिक होती. आवकेतील हा कल या सप्ताहात सुद्धा दिसून येत आहे.

या सप्ताहात कापूस व सोयाबीन यांच्या किमती घसरल्या. कांद्याखेरीज इतर पिकांच्या वाढल्या. टोमॅटोच्या किमती आता वाढू लागल्या आहेत. २४ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात १.८ टक्क्यांनी घसरून प्रती खंडी रु. ६०,९८० वर आले होते. या सप्ताहात ते ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ६०,६८० वर आले आहेत.

एप्रिल फ्युचर्स भावसुद्धा ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ६०,९४० वर आले आहेत. जून फ्युचर्स रु. ६१,९६० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा २.१ टक्क्यांनी अधिक आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात १ टक्क्यांनी घसरून रु १,५१२ वर आले होते.

या सप्ताहात ते ०.४ टक्क्यांनी वाढून रु. १,५१८ वर आले आहेत. एप्रिल फ्युचर्स रु. १,५७५ वर आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत. कापसाची आवक अजून वाढत्या पातळीवर आहे. भाव घसरत आहेत.

मका

NCDEX मधील मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा, सांगली) जानेवारी महिन्यात स्थिर होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,०९४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. २,१४० वर आल्या आहेत.

फ्युचर्स (एप्रिल डिलिव्हरी) किमतीसुद्धा २ टक्क्यांनी वाढून रु. २,१५२ वर आल्या आहेत. जून फ्युचर्स किमती रु. २,१७८ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.८ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. मक्याची आवक कमी होत आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या रु. ६,७८७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ६,९९६ वर आल्या आहेत.

एप्रिल फ्युचर्स किमती २.७ टक्क्यांनी वाढून रु. ६,८९६ वर आल्या आहेत. जून फ्युचर्स किमती रु. ७,०६० वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या ०.९ टक्क्यांनी अधिक आहेत. आवक वाढत आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात सप्ताहात ४,७२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,८५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. आवक वाढू लागली आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती फेब्रुवारी महिन्यात कमी होत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.९ टक्क्यांनी घसरून ५,३५३ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ०.५ टक्क्यांनी घसरून ५,३२८ वर आली आहे.

सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे. आवक काहीशी कमी झाली आहे; पण भावातील घसरण थांबलेली नाही.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.८ टक्क्यांनी वाढून रु. ७,५३३ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ४.९ टक्क्यांनी वाढून रु. ८,५०० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे. तुरीची बाजार समितीतील सर्वाधिक साप्ताहिक आवक फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात होती; त्यानंतर ती घसरत आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purpravan Gave: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६५ गावे पूरप्रवण

Alu Farming Success: वर्षभर अळूला तयार केली बाजारपेठ

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

SCROLL FOR NEXT