Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : शेतकऱ्यांकडे अजून किती सोयाबीन शिल्लक?

Soybean Production : यंदा देशातील उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा वाढलं. त्यातच गेल्या हंगामातील शिल्लक साठाही जास्त होता. त्यामुळे यंदा देशात १५४ लाख टनांचा पुरवठा झाला.

Anil Jadhao 

Soybean Bajarbhav : यंदा देशातील उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा वाढलं. त्यातच गेल्या हंगामातील शिल्लक साठाही जास्त होता. त्यामुळे यंदा देशात १५४ लाख टनांचा पुरवठा झाला. देशात मे महिन्यापर्यंत बाजारातील आवक गेल्यावर्षीपेक्षा जास्त राहिली.

बाजारात मे पर्यंत ९१ लाख टनांची आवक झाली. तर सोयापेंड निर्यात १४ लाख ५३ हजार टनांवर पोचली, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने सांगितले.

देशातील बाजारात मागील चार महिन्यांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा असल्याने माल मागं ठेवला. पण शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव अजून मिळाला नाही. मागील हंगामात सोयाबीनला ८ हजारांचा भाव पहिल्यानंतर यंदाही बाजार याच दिशेने जाईल अशी आशा होती.

पण गेल्यावर्षी मार्चनंतर वाढलेला सोयाबीन बाजार यंदा मात्र दबावात आला. चालू हंगामात सोयाबीनने ६ हजारांंचाही टप्पा पार केला नाही. परिणामी अजूनही अनेक शेतकरी सोयाबीनचा स्टाॅक ठेऊन आहेत.

सोपाने मे महिन्याच्या अंदाज यंदा बाजारातील आवक वाढल्याचे म्हटले आहे. सोपाच्या मते, ऑक्टोबर ते मे या काळात देशातील बाजारात ९१ लाख टन सोयाबीनची आवक झाली होती. गेल्या हंगामात याच काळातील आवक ७० लाख टन होती.

म्हणजेच यंदा २१ लाख टनाने जास्त आवक राहिली. यंदा गेल्यावर्षीपेक्षा सोयाबीन पुरवठा जास्त असला तरी बाजारातील आवक जास्त झाल्याने आता शिल्लक माल कमी राहिला.

सोयापेंड निर्यातीची झेप

सोयापेंड निर्यातीचा विचार करता मे महिन्यापर्यंत देशातून १४ लाख ५३ हजार टनांची निर्यात झाली, असे सोपाने स्पष्ट केले. गेल्या हंगामातील निर्यात ५ लाख टन होती. म्हणजेच यंदाची निर्यात जवळपास तीन पटीने जास्त आहे. महिनानिहाय निर्यातीचा विचार करता मार्चमध्ये विक्रमी सव्वातीन लाख टनांची निर्यात झाली.

तर मे महिन्यात ७५ हजार टन सोयापेंड भारताने इतर देशांना दिली. देशात मे महिन्यापर्यंत जवळपास ६२ लाख टनांची निर्मिती झाली होती. जी गेल्यावर्षीपेक्षा जवळपास १८ लाख टनांनी जास्त होती.

देशाचा सोयापेंड वापर वाढला

देशातील सोयापेंड वापराचा विचार करता यंदा मानवी आहार आणि पशुखाद्यतही वापर वाढला आहे. मानवी आहारात सोयापेंडचा वापर यंदा १ लाख टनाने वाढून ६ लाख २५ हजार टनांवर पोचला. पशुखाद्यातील वापरही साडेतीन लाख टनाने वाढला. देशातील पशुखाद्य उद्योगाने आतापर्यंत ४२ लाख ५० हजार टनांची उचल केली, असेही सोपाने म्हटले आहे.

किती सोयाबीन शिल्लक?

सोपाच्या मते, यंदा देशात १२४ लाख टनांचे उत्पादन झाले. तर मागील हंगामातील २५ लाख टन शिल्लक साठा होता. त्यामुळे यंदा १५४ लाख टनांचा पुरवठा झाला. जो गेल्यावर्षीपेक्षा २८ लाख टनांनी जास्त होता. यंदा एकूण पुरवठ्यापैकी ९१ लाख टन सोयाबीन मे पर्यंत बाजारात आलं.

आता शेतकरी, प्रक्रिया प्लांट्स, व्यापारी यांच्याकडे ५९ लाख टनांचा स्टाॅक आहे. गेल्या हंगामात हा ५३ लाख टनांचा होता, असेही सोपाने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT