Cotton Agrowon
ॲग्रोमनी

Cotton : गुजरातचा कृषी विभाग एचटीबीटी विरोधात सजग

देशातील बाजारात कपाशीचे अवैध १५ टक्‍के बियाणे दाखल झाल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये एचटीबिटी (तणनाशक सहनशील) या बोलगार्ड-४ तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या बियाण्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर समवेश आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः देशात अनधिकृत बियाण्यांचे केंद्र म्हणून गुजरात (Gujrat Center Of Illegal Seed) नावारूपास आले आहे. एचटीबीटी तंत्रज्ञानाचा (HTBT Technology) अंतर्भाव असलेल्या कापूस बियाण्यांचे उत्पादनासोबतच (Cotton Seed Production) व्यवस्थापनदेखील या भागात होते. हे सारे काही खुलेआम सुरू असताना राज्य सरकारची यंत्रणा मूग गिळून गप्प असल्याने हा सारे सरकारच्या छत्रछायेखाली सुरू असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. गुजरातच्या कृषी विभागाने मात्र हे आरोप फेटाळत अशा प्रकारांवर नियंत्रणासाठी सजग असल्याचा दावा केला आहे.

देशातील बाजारात कपाशीचे अवैध १५ टक्‍के बियाणे दाखल झाल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये एचटीबिटी (तणनाशक सहनशील) या बोलगार्ड-४ तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या बियाण्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर समवेश आहे. केंद्र सरकारने या बियाण्यांच्या चाचण्यांना स्थगिती दिली होती. त्यानंतर तंत्रज्ञान पुरवठादार कंपनीकडून देशांतर्गत चाचण्या थांबविल्याचे चर्चा होती. परंतु अनधिकृतपणे हे काम सर्रास सुरू असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. या गैरप्रकाराला शासकीय यंत्रणांचे पाठबळ असल्याने हा व्यवसाय नजीकच्या काळात चांगलाच फोफावला आहे.

काही शेतकरी संघटनांना हाताशी धरत त्या माध्यमातून अनधिकृत बियाणे लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा वापर केला जातो; मात्र गेल्या हंगामात अशाप्रकारचे अनधिकृत बियाणे लावणारा शेतकरी परत हे बियाणे लावण्यास धजत नाही. कारण हे बियाणे तणनाशक सहनशील असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ते नसते. त्यामुळे शेतकरी तणनाशकाची थेट फवारणी करताच अनेक ठिकाणी थेट संपूर्ण पीकच उद्ध्वस्त झाल्याचे प्रकार घडले. पंरतु बियाणे अनधिकृत असल्याने आणि खरेदीची पावती नसल्याने शेतकऱ्यांना तक्रारही करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गप्प राहावे लागते. परंतु या साऱ्या प्रकारात त्यांचा हंगाम वाया जातो. अशाप्रकारे एकदा फसवणूक झालेले शेतकरी दुसऱ्यांदा ही चूक करीत नसले तरी नवे शेतकरी मात्र या आमिषाला बळी पडतात आणि हे फसवणुकीचे चक्र सुरूच राहते.

राज्यात यंदाही १५ टक्‍के बियाणे बाजार अशाच अनधिकृत बियाण्यांनी व्यापला आहे. सुमारे एक कोटी एचटीबिटी कापूस बियाण्यांची लागवड यंदा देशभरात झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे यंदाही अनेक शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्‍यता या क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तविण्यात आली आहे.

गुजरात राज्य हे अनधिकृत एचटीबीटी बियाणे बीजोत्पादनाचे केंद्र ठरल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. परंतु त्या भागातील सरकारकडून यावर निर्बंधासाठी पूरक प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे अनधिकृत बियाण्यांबाबत काय कारवाई केली, अशी माहिती मागणारे पत्र गुजरात सरकारला दिले होते. त्यावर आम्ही वेळोवळी कारवाई करून यावर नियंत्रणाचे प्रयत्न करतो, असे उत्तर तेथील कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेकडून देण्यात आले आहे. २०२०-२१ मध्ये १४ वाणांमध्ये तणनाशक सहनशील जीन आढळून आला होता. या सर्व प्रकरणात फौजदारी कारवाई करण्यात आली. सर्व जिल्हास्तरीय तसेच फिल्डवरील कर्मचाऱ्यांना देखील अशा प्रकरणांमध्ये दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. परंतु ही कारवाई थातूरमातूर वाटते.
विजय जावंधिया, शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Payout : पंचाहत्तर हजार शेतकऱ्यांना ५५ कोटींचे पीकविमा भरपाई

POCRA Scam : पोकरातील गैरप्रकारप्रकरणी अहवालानंतर कारवाई

Agri Produce Grading Technology : प्रतवारीसाठी आधुनिक उपकरणे

Inter Cropping : आंतरपीक पद्धतीवर द्या भर

Kharif Sowing: पावसाच्या आगमनानुसार कोणत्या पिकांची लागवड करता येते?

SCROLL FOR NEXT