Market Bulletin: सोयाबीनमध्ये नरमाईसोयाबीनच्या भावात आजही काहीशी नरमाई पाहायला मिळाली. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव आज ५ हजार ३५० ते ५ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ७०० ते ५ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला होता. सोयाबीनची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून कमी झालेली आहे. मात्र सोयापेंडला उठाव धिमा असल्याचे प्रक्रियादार सांगत आहेत. याचा दबाव दरावर येत आहे. सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस नरमलादेशातील बाजारात कापसाच्या भावात आजही नरमाई पाहायला मिळाली. सीसीआयने कापूस विक्रीचे भाव कमी केले आहेत. त्याचा परिणाम कापसाच्या भावावरही दिसून आला. सीसीआयने आज कापूस विक्रीचा भाव ११०० रुपयाने कमी केला होता. त्यामुळे बाजार समित्यांमधील भावही १०० ते २०० रुपयाने कमी झाले होते. कापसाला आज बाजारात सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपये भाव मिळाला. कपासच्या भावात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Cotton Price Fall: पांढऱ्या सोन्याच्या दरात घसरण.मका आवक चांगलीदेशातील बाजारात मक्याची आवक चांगली सुरु आहे. त्यातच आयातीची शक्यता असल्याने दबाव वाढला आहे. देशातील उत्पादन यंदा वाढलेले आहे. त्याचा दबाव दरावर आधीच आलेला आहे. रब्बी हंगामातही उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मक्याचा उठाव यंदा कमी झालेला आहे. याचा दबाव भावावर आलेला आहे. सध्या मका बाजारात १६०० ते १९०० रुपयाने विकला जात आहे. पुढील काळातही मक्याची बाजारातील आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरावर दबावरही कायम राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Banana Rate: केळी दर पोहोचला १७०० रुपये क्विंटलवर.केळी भाव टिकूनराज्यातील बाजारात केळीचे भाव टिकून आहेत. सध्या बाजारातील केळीची आवक मर्यादीत दिसत आहे. तसेच केळीला उठाव चांगला आहे. यंदा केळी पिकाला बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊन उत्पादन कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. बाजारातील आवक कमी आणि मागणी चांगली असल्याचा भावाला आधार मिळत आहे. सध्या केळी बाजारात १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. केळीचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज केळी बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत..पपई खातेय भावराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून पपईची आवक स्थिर आहे. तर दुसरीकडे पपईला मिळणारा उठाव चांगला आहे. यामुळे पपईचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये टिकून असल्याचे दिसत आहे. सध्या पपई गुणवत्तेप्रमाणे प्रक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयाने विकली जात आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने पपईला उठाव मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच पपईची आवकही सुधारण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पपईचा बाजार स्थिर दिसू शकतो, असा अंदाज पपई व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.