Sangli News: वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शिराळा तालुक्यातील मणदूर येथील ग्रामस्थांनी आता तीव्र भूमिका घेतली आहे. ‘‘पाळीव प्राणी गेले, शेती गेली; आता भीती जीवावर बेतली आहे,’’ अशा शब्दांत संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी ९ मार्चपासून ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्धार जाहीर केला आहे..ज्येष्ठ श्रमिक नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. १९) मणदूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत वनविभागाच्या कथित उदासीन कारभारावर जोरदार टीका करण्यात आली..Villagers Protest: अदानी प्रकल्पाविरोधात पाटण तालुक्यातील सात गावे आक्रमक.गेल्या महिन्यात परिसरात वन्यप्राण्यांचे तीन हल्ले झाले आहेत. गावात गव्यांनी केलेल्या दोन हल्ल्यांत चार जण गंभीर जखमी झाले. तसेच कुत्री व इतर पाळीव प्राण्यांवरही हल्ले झाले आहेत. या आंदोलनाला शिराळा तालुक्यासह शाहूवाडी तालुक्यातील खेडे, शिराळे वारुण, शित्तूर वारुण आणि उखूळ येथील ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. .Model Village: ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पना देशव्यापी व्हावी : कुलगुरू गडाख.बैठकीस मणदूरच्या सरपंच शोभा माने, माजी सरपंच वसंत पाटील, पाचगणीचे सरपंच संदीप पाटील, खेडे (ता. शाहूवाडी) चे सरपंच बाबाराम कांबळे, विलास तोळसणकर, संजय पोळ उपस्थित होत्या. ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वनप्रशासन व शासन काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..प्रमुख मागण्याउपद्रवी व हिंस्र वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा.अभयारण्याच्या सीमेवर संरक्षक भिंत किंवा सोलर फेन्सिंग उभारावे, जेणेकरून प्राणी मानवी वस्तीत शिरणार नाहीत..जंगलात पुरेसा अन्नसाठा व पाण्याची व्यवस्था होईपर्यंत नवीन वन्यप्राणी सोडू नयेत.वन्यजीव व्यवस्थापनासाठी खर्च होणाऱ्या निधीचा संपूर्ण लेखाजोखा जाहीर करून ग्रामस्थांना प्रत्यक्ष पाहणीची संधी द्यावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.