Cotton : दोन एकरांतील कापूस ‘मिलीपीड’ने केला उध्वस्त

केंद्रीय कापूस संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब फंड म्हणाले, ‘‘ मिलीपीडचा रंग गर्द तपकिरी, तांबूस काळपट किंवा लालसर असतो. प्रजातीनुरूप ३४ पासून ते ४०० पर्यंत पाय असतात.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

आरेगाव, जि. यवतमाळ : शेलु (कोपरा) शिवारात शेत सर्वे क्र.१३ मधील दोन एकरांतील अंकुरलेल्या कापूस पिकाचे (Cotton Crop) वाणी (मिलीपीड) (काही भागात ‘पैसा’) या किडीने प्रचंड नुकसान कले आहे, असे शेतकरी वर्षा जयकुमार भालेकर सांगितले. (Millipedes Pest On Cotton Crop)

या बाबतची माहिती अशी की, शेलु परिसरात चांगला पाऊस पडल्याने भालेकर यांनी कपाशीची लागवड रविवारी (ता.१९) केली होती. दोन दिवसानंतर अंकुर बाहेर येऊन कपाशीचे पीक दोन पानांवरही आले. परंतु शनिवारी (ता.२५) सकाळी शेतात गेले असता कपाशीचे अंकुर कुरतडलेल्या अवस्थेत दिसून आले. काही कळायच्या आत दोन दिवसांतच शेतातील रोपावस्थेतील कवा अंकुर अवस्थेतील संपूर्ण कपाशीच मिलीपीड या किडीने (स्थानिक नाव वाणी, पैसा) फस्त केली. अखेर बुधवारी (ता.२९) वखर टाकून पीक काढून टाकले. बियाणे व लागवड खर्च वाया गेला. त्यामुळे इतर शेतकरीही धास्तावले आहेत.

Cotton
कापूस, दादर ज्वारीसह भादलीची दुग्धोत्पादनात ओळख

मिलीपीड किडीविषयी

केंद्रीय कापूस संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब फंड म्हणाले, ‘‘ मिलीपीडचा रंग गर्द तपकिरी, तांबूस काळपट किंवा लालसर असतो. प्रजातीनुरूप ३४ पासून ते ४०० पर्यंत पाय असतात. ही कीड मुख्यत्वे जमिनीवर राहते. काही प्रजाती जमिनीलगत मातीत आढळतात. जास्त आर्द्रता, उष्ण व दमट वातावरण वाढीसाठी अनुकूल असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला (मे व जून) पडणाऱ्या हलक्या व तुरळक सरींमुळे जमिनीत सुप्तावस्थेत असलेल्या किडीच्या जीवनक्रमास चालना मिळते. कमी पर्जन्यमान (२५० मिमी) व वातावरणातील बदलांमुळे प्रजनन झपाट्याने होते. पडीक व गवताळ जमिनीत प्रजनन अधिक होते. खरीप पिकांची पेरणी केल्यानंतर उगवण ते रोपावास्थेदरम्यान जास्त काळ पावसाचा खंड पडला तर ही कीड अंकुरणारे बी कुरतडून जास्त नुकसान करते. हंगामात पुढे जोराच्या मुसळधार पावसाच्या माऱ्यामुळे किडी नष्ट होतात. निसर्गतः प्रादुर्भाव कमी होतो.

नुकसानीचा प्रकार

-खरिपात पेरणीनंतर रोपावस्थेमध्ये प्रादुर्भाव.

- रोपट्यांच्या बुंध्याशी डोके खुपसून अंकुरलेले बी खातात.

- उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने फस्त करतात.

- रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात

- बहुभक्षी कीड आहे. अंकुरणाऱ्या ज्वारीचे मोठे नुकसान करते.

...........

संपर्क- बाबासाहेब फंड, ७५८८७५६८९५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com