Satara News: कृषी विभागामार्फत सातारा येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात नुकतेच पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झाले..या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. महोत्सवामध्ये ज्वारीच्या विविध वाणांचे धान्य त्यामध्ये मालदांडी, सुपर मोती, परभणी मोती, फुले रेवती व फुले सूचित्रा परळी खोऱ्यातील देशी नाचणी, तांदूळ, जावळीची नाचणी, मान व खटावची बाजरी, मूग व ज्वारी उपलब्ध होणार आहेत..Millet Festival : कोल्हापुरातील तृणधान्य महोत्सवास चांगला प्रतिसाद.कडधान्यांमध्ये जात्यावर दळलेली मुग, उडीद, काळ्या घेवड्याची डाळ तसेच हिरवा मूग, हुलगे आदी महोत्सवामध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईची सेंद्रिय हळद तसेच मिलेटचे विविध पदार्थ त्यामध्ये विविध प्रकारच्या, नाचणीच्या शेवया, नाचणीचे इडली पीठ, उडीद लाडू,.नाचणी अंबिल तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ आदी वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.