Groundnut Agrowon
ॲग्रोमनी

Groundnut : आंध प्रदेशात विस्तारणार भुईमूग लागवड क्षेत्र

कापसासोबतच मिरची लागवड क्षेत्रासाठी देखील आंध्र प्रदेशची ओळख आहे. सध्या राज्यात एक हजार हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नागपूर ः भुईमूग (Groundnut), कापूस लागवड (Cotton Cultivation) आणि उत्पादनासाठी आघाडीवर असलेल्या आंध प्रदेश राज्यात यंदा ३८.५७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे (Kharif Crop Sowing) नियोजन करण्यात आले आहे. त्यातील सुमारे २ लाख हेक्टरवर आतापर्यंत लागवड झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक ६० हजार हेक्टर कापूस तर ५५ हजार हेक्टरवर भुईमूग (Groundnut Cultivation) आहे. आंध्र प्रदेशात यंदाच्या खरिपात ६.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचे उद्दिष्ट आहे.

कापसासोबतच मिरची लागवड क्षेत्रासाठी देखील आंध्र प्रदेशची ओळख आहे. सध्या राज्यात एक हजार हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात देखील आजच्या कालावधीपर्यंत इतक्याच क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात आली होती. हळद लागवड क्षेत्रदेखील गेल्या वर्षीच्या इतकेच असून, सध्या दोन हजार हेक्टरवर हळदीची लागवड पोहोचली आहे. तुरीची लागवड चार हजार हेक्टरवर असून, गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ती केवळ दोन हजार हेक्टरवर होती. गेल्या हंगामात उडीद क्षेत्र दोन हजार हेक्टर असताना या वर्षी ते एक हजार हेक्टरचे आहे. मुगाची लागवड याच कालावधीत गेल्या हंगामात तीन हजार हेक्टर असताना अद्याप मूग लागवडीला या भागात सुरुवात झाली नाही.

राज्यात भुईमुगाची लागवड गेल्या हंगामात ३४ हजार हेक्टर इतकी अत्यल्प असताना यंदा ती ५५ हजार हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. यंदाच्या हंगामात भुईमूग लागवड क्षेत्र वाढीला प्रोत्साहन दिले जात असून, त्याच धोरणांतर्गत हे क्षेत्र कापसापेक्षा अधिक म्हणजे ७.३० लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. एरंडीची याच कालावधीत गेल्या हंगामात एक हजार हेक्टर इतकी अत्यल्प लागवड असताना यंदा ती दोन हजार हेक्टरवर पोहोचली आहे. एरंडीची लागवड २२ हजार हेक्टर निर्धारित आहे. तीळ लागवडीसाठी १५ हजार हेक्टरचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले असून, त्यापैकी १० हजार हेक्टरवरील लागवड आटोपली आहे. गेल्या हंगामात ती ९ हजार हेक्टर होती. गेल्या हंगामातील याच कालावधीची तुलना करता धानाची लागवड गेल्या वर्षी ४५ हजार, तर यंदा ७९ हजार हेक्टरवर झाली आहे. मका लागवड गेल्या हंगामात सात हजार तर यंदा ११ हजार हेक्टरवर झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT