Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस दर केवळ आवक वाढल्याने नरमले का?

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव चालू महिन्यात क्विंटलमागं १३०० रुपयाने कमी झाले. त्यामुळं भारताची कापूस खंडी आंतरराष्ट्रीय बाजारात ५ ते ७ हजारांनी महाग पडत आहे.

Anil Jadhao 

Cotton Rate : मार्च महिन्यात देशातील बाजारात कापसाची आवक (Cotton Arrival) वाढली. याचा दबाव सध्या दरावर आहे. पण हंगामातील एकूण आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळं उद्योगांना कमी कापूस मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या नरमाईचा दबावही जाणवत आहे.

पण देशातील कापूस वापराची वाढलेली क्षमता आणि घटलेल्या उत्पादनाचा कापूस बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी मार्च महिन्यापर्यंत ९० टक्के कापूस विकला होता. पण यंदा मार्चपर्यंत केवळ ५० टक्के कापूस बाजारात आला होता. गेल्या हंगामात मार्चनंतर कापूस दरात मोठी सुधारणा झाली होती.

कापसाने ९ ते १० हजारांचा टप्पा गाठला होता. त्यामुळं यंदा देशातील शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, पंजाब आणि हरियाना या महत्वाच्या राज्यांमध्ये आजही जवळपास ४० टक्के कापूस असल्याचे सांगितले जाते.

मागील हंगामात कापसाचा वापर जास्त झाला. त्यातच उत्पादन घटलं होतं. त्यामुळं शिल्लक कापूस कमी राहीला. परिणामी हंगामाच्या सुरुवातीला कापूस दरात सुधारणा पाहयला मिळाली. त्यामुळं पुढील काळात गेल्यावर्षीप्रमाणं दर मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

पण मार्च महिन्यात कापसाची आवक वाढली. त्यामुळं दरावर दबाव आला. मार्च महिन्यातील कापूस आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली. आवकेसोबतच इतरही काही घटकांचा परिणाम दरावर झाला.

त्यामुळं दरात क्विंटलमागं एक हजार रुपयांची नरमाई आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाईचीही जोड मिळाली.

वाढती महागाई आणि बॅंकींग क्षेत्रातील संकटामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव नरमले. रुईचे भाव ८५ सेंट प्रतिपाऊंड म्हणजेच १५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलवरून ७८ सेंट प्रतिपाऊंडपर्यंत कमी झाले.

रुपयात सांगायचं झालं तर भाव १४ हजार १८० रुपयांपर्यंत नरमले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात नरमाई अल्यानं निर्यातीवर परिणाम होतोय.

कापसाचे तुलनात्मक भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव चालू महिन्यात क्विंटलमागं १३०० रुपयाने कमी झाले. त्यामुळं भारताची कापूस खंडी आंतरराष्ट्रीय बाजारात ५ ते ७ हजारांनी महाग पडत आहे.

देशात कापूस खंडीचे भाव ६० ते ६२ हजार रुपयांवर आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस खंडी ५२ ते ५५ हजाराने मिळते. त्यामुळं निर्यातीवर परिणाम होत आहे.

वर्षभर आवक राहील?

सध्या शेतकऱ्यांकडून पॅनिक सेलिंग सुरु आहे. कापूस ठेवण्यात अनेक शेतकऱ्यांना अडचणी आहेत. हे शेतकरी सध्या नाइलाजाने कमी दरात कापूस विकत आहेत. पण अनेक शेतकरी यंदा जास्त काळासाठी कापूस ठेऊ शकतात.

त्यामुळं काही जिनिंग वर्षभर सुरु राहतील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. एरवी शेतकरी पहिल्या सहा महिन्यातच कापूस विकतात. पण यंदा शेतकरी वर्षभर कापूस विकू शकतात, हे जिनिंग उद्योगानेही गृहीत धरले आहे.

कापूस बाजाराला आधार

देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केला जात आहे. चालू महिन्यातील अंदाज ३१३ लाख गाठींचा आहे. देशातील कापूस वापराची उद्योगांची क्षमता आता ३०० लाख गाठींपर्यंत वाढली आहे. हे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे.

त्यामुळं निर्यात कमी राहिली तरी जास्त कापूस शिल्लक राहणार नाही. त्यामुळं कापूस दरालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बाजारात कापसाची आवक कमी असल्यानं खानदेशातील ९० टक्के जिनिंग बंद पडल्या. कापूस मागं ठेवल्यानं शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळेल, अशी आशा होती. पण बाजारात दर दबावात आहेत. यामुळं शेतकऱ्यांना कमी दरात कापूस विकावा लागतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर नरमल्यानं जिनिंग, सूतगिरण्या आणि निर्यतदारही संकटात आले.
प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT