Kharif Sowing Agrowon
ॲग्रोमनी

Kharif Season : पावसाअभावी देशात लागवड क्षेत्रात घट

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून लागवड क्षेत्राची ताजी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार, शुक्रवारपर्यंत (ता. १) देशभरात २५९.६१ लाख हेक्‍टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः हवामान खात्याने यंदा मॉन्सून (Monsoon) समाधानकारक राहणार असल्याचे सूतोवाच हंगामाच्या (Kharif Season) आधीच केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच आता जून महिना लोटल्यानंतरही देशाचा बराच भाग कोरडा राहिला आहे. देशात सद्यःस्थितीत या महिन्यातील सरासरीच्या दहा टक्‍के कमी पाऊस (Low Rainfall) झाला आहे. त्याचा परिणाम पेरण्यांवर (Effect On Kharif Sowing) झाला असून याच कालावधीतील गेल्यावर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात (Sowing Acreage) पाच टक्‍के घट झाली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून लागवड क्षेत्राची ताजी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार, शुक्रवारपर्यंत (ता. १) देशभरात २५९.६१ लाख हेक्‍टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत २७२.२१ लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. याचा विचार करता लागवड क्षेत्रात गेल्यावर्षीपेक्षा ४.६३ टक्‍क्‍यांची घट झाली आहे. डाळवर्गीय पिकाच्या लागवड क्षेत्रात ६.९८ टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली आहे. हे क्षेत्र वाढत २८ लाख हेक्‍टरवर पोहोचले आहे. देशात डांगर (काळा भोपळा, कोहळे) यांचे लागवड क्षेत्र २७ टक्‍क्‍यांनी घटले असून यंदा ४३.४५ लाख हेक्‍टरवर त्याची लागवड झाली आहे. याचाच सर्वाधिक परिणाम एकूण खरीप लागवड क्षेत्र कमी होण्यावर झाल्याचे सांगितले जाते.

पाऊस चांगला झाल्यास यापुढील काळात डांगर लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तेलबियावर्गीय पिकांच्या क्षेत्रातही सहा टक्‍क्‍यांनी घट नोंदविण्यात आली आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र याच कालावधीत ५०.४ लाख हेक्‍टर इतके होते. यावर्षी ते ४६.२६ लाख हेक्‍टर इतकेच मर्यादित राहिले आहे. कापूस लागवड क्षेत्रात मात्र ३.८१ टक्‍के वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कापूस लागवड ६१.७३ लाख हेक्‍टर असताना यंदा ती ६४.०८ लाख हेक्‍टरवर पोहोचली आहे. पुढील आठवड्यात लागवड क्षेत्र अधिक विस्तारेल, अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. विशेष म्हणजे देशभरात १ जूनपासून मॉन्सून सक्रिय झाला. परंतु जुलै महिन्याला सुरुवात झाल्यानंतरही देशाच्या अनेक भागांत त्याची वाटचाल समाधानकारक नाही. परिणामी पेरण्या रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

१ जुलैपर्यंतची लागवड स्थिती (चौकटीत यंदाची तर चौकटीबाहेर गेल्यावर्षीची)

डांगर ः ५९.५६ (४३.४५)

डाळवर्गीय ः २८.०६

धान्य ः १४.२३ (१८.०४)

तेलबियावर्गीय ः ५०.२४ (४६.२६)

ऊस ः ५३.४ (५२.९२)

कापूस ः ६१.७३ (६४.०८)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fuel Crisis: इंधन सुरक्षाच ‘गॅस’वर

Indian Farmers: अमेरिकन शेतकऱ्यांशी स्पर्धेत भारतीय शेती टिकणार का?

Crop Loan: पीक कर्ज भरण्यासाठी अखेरचे चार दिवस बाकी

Land Record Fraud: सातबारा, फेरफार नोंदीत बेकायदा बदल

Iran US War: युद्धाचा पेच अधिक गडद

SCROLL FOR NEXT