Cotton Production Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Production: देशातील कापूस उत्पादन १२ टक्क्यांनी वाढणार

युएसडीने (USDA) जागतिक कापूस उत्पादन (Cotton Production) २०२२-२३ मध्ये १५३.७ दशलक्ष गाठींपर्यंत वाढण्याचा अंदाज दिला. एक कापूस गाठ १७० किलोची असते.

Team Agrowon

पुणेः जागतिक कापूस बाजारात (Cotton Market) २०२२-२३ च्या हंगामात चित्र बदलेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं व्यक्त केला. जागतिक कापूस उत्पादनात (Cotton Production) ३.३ टक्क्यांनी वाढ होईल, मात्र कापसाचा वापर जवळपास स्थिर राहील, निर्यातीतील अडथळे दूर होतील, तर महागाई आणि बॅंकांच्या व्याजदरवाढीचा परिणाम बाजारावर जाणवेल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला. तसचं भारतातील कापूस उत्पादन १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यताही वर्तविली.

युएसडीने (USDA) जागतिक कापूस उत्पादन (Cotton Production) २०२२-२३ मध्ये १५३.७ दशलक्ष गाठींपर्यंत वाढण्याचा अंदाज दिला. एक कापूस गाठ १७० किलोची असते. तर चालू हंगामातील उत्पादन १४८.८ दशलक्ष गाठींवर स्थिरावलं होतं.

म्हणजेच पुढील हंगामात उत्पादनात ३.३ टक्के वाढ होईल. पण भारतात मात्र १२ टक्क्यांनी उत्पादन वाढून ३५.२ दशलक्ष गाठींवर पोचेल. चालू हंगामात देशात ३१.३७ दशलक्ष गाठी कापूस हाती आला होता. तर चीनमध्ये ३४.५ दशलक्ष गाठी कापूस होई, असं युएसडीएनं (USDA) आपल्या अहवालात म्हटलंय. चालू हंगामात कापूस दरातील तेजी, वाहतुकीसाठी कंटेनर्सची झालेली भाडेवाढ आणि मर्यादीत पुरवठा, यामुळं कापूस दरवाढ झाली होती.

त्यातच सध्या जागात सर्वंच देशांत महागाई वाढली, अनेक देशांनी व्याजदर वाढविले, परिणामी कापूस आणि कपड्यांना ग्राहकांची मागणी कमी राहू शकते. त्यामुळं जागतिक कापूस वापरातील वाढ कमी होण्याची शक्यता आहे. २०२२-२३ च्या हंगामात जागतिक कापूस वापर १५३.४९ दशलक्ष गाठींवर होण्याची शक्यता आहे. मागील हंगामातील वापर १५३.४२ लाख गाठींवर होता.

दरातील तेजी टिकेल का?

यंदा कपड्यांना मागणी वाढली होती. त्यामुळं सुतालाही उठाव मिळाला. परंतु पुढील हंगामात मागणी कमी राहून सूत उत्पादन आणि वापरावर परिणाम होईल. चालू हंगामात कापूस निर्यातीत (Cotton Export) असलेले अडथळे पुढील हंगामात दूर होतील. त्यामुळं निर्यात सुरळीत होईल, असंही या अहवालात म्हटलंय. परंतु अमेरिकेतील कापूस दर गेल्याहंगामच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता आहे. गेल्याहंगामात शेतकऱ्यांना मिळणारा दर ९२ सेंट प्रतिपाऊंड होता. तर यंदा हाच दर ९५ सेंटवर मिळेल, असाही अंदाज युएसडीने वर्तविला. भारतीय चलनात हा दर ६० हजार रुपये होतो.

मागणी घटणार

चालू हंगामात चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांची मागणी वाढली (Cotton Demand) होती. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील दर टिकून होते. मात्र पुढील हंगामात उत्पादनातील वाढ, कमी मागणी यामुळं दरातील तेजी कमी होईल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय.

बाजारात प्रतिक्रीया
भारतासह जागतिक कापूस उत्पादनवाढीचा (Growth In Cotton Production) अंदाज आल्यानंतर बाजारात त्याची प्रतिक्रिया उमटली. इंटरनॅशनल काॅटन एक्सचेंजवर कापसाचा दर गेल्या दहा महिन्यांती निचांकी पातळीवर पोचला. कापसाला सरासरी ९४ सेंट प्रतिपाऊंड दर मिळतोय. खंडीमध्ये हा दर ७४ हजार ५७५ रुपये होतो. तर देशातील दर ८६ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर आहेत. एमसीएक्सवर कापसाचे व्यवहार ८१ हजार रुपयाने होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT