Cotton Market
Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस उत्पादनाच्या अंदाजात पुन्हा १० लाख गाठींची कपात

Team Agrowon

Cotton Rate Update : हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी दिलेली माहीती आता खरी ठरली. काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयनं (CAI) एप्रिल महिन्याचा आपला कापूस उत्पादनाचा अंदाज जाहीर केला.

या अंदाजात सीएआयनं बाजारातील समिकरण बदलून टाकणारी माहिती दिली. सीएआयनं या अंदाजात देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज १० लाख गाठींनी कमी करून ३०३ लाख गाठींवर स्थिरावेल अशी माहिती दिली. तर पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा अनेक वर्षातील निचांकी पातळीवर राहील, असंही म्हटलं.

काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयची बैठक झाली. यात देशातील कापूस उत्पादन, वापर, निर्यात आणि पुढील हंगामासाठी शिल्लक साठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सीएआयनं एप्रिल महिन्याचा अंदाज जाहीर केला.

या अंदाजात सीएआयनं देशातील कापूस उत्पादन पुन्हा १० लाख गाठींनी कमी केलं. म्हणजेच आता देशात ३१३ लाख गाठींऐवजी ३०३ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा अंदाज सीएआयनं दिला. म्हणजेच देशातील कापूस उत्पादन १४ वर्षांमधील निचांकी पातळीवर पोचलं.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसानं कापूस पिकाला मोठा फटका बसला होता. त्यामुळं कापूस उत्पादनात मोठी घट झाल्याचं शेतकरी सांगत होते. कापूस बाजारातील काही जाणकारांनीही उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहील, असा अंदाज दिला होता.

पण आपल्याकडं उत्पादनाचा अंतिम अंदाज येण्यासाठी हंगाम शेवटाकडं जातो. त्यामुळं उत्पादन घटून कापूस टंचाई निर्माण झाली तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. यंदाचंच बघा, उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी असल्याचा अंदाज आता आला. पण शेतकऱ्यांकडं कमी कापूस उपलब्ध असल्याचं सांगतलं जातं.

विशेष म्हणजे यंदा कापसाचा वापर ३११ लाख गाठी होईल, असा अंदाजही सीएआयनं व्यक्त केला. याचाच अर्थ असा की, यंदा देशातील कापूस उत्पादन वापरापेक्षाही कमी होणार आहे. हाच अंदाज गृहीत धरला तरी देशातील उद्योगांना लागणाऱ्या कापसाच्या तुलनेत आपल्याकडचं उत्पादन ८ लाख गाठींनी कमी आहे. देशातील उद्योगांची क्षमता वाढल्यानं कापूस वापरही वाढलाय.

देशातील यंदाचं उत्पादन, मागील हंगामातील शिल्लक साठा आणि १५ लाख गाठी आयातीसह देशात यंदा जवळपास ३५० लाख गाठी कापसाचा पुरवठा होईल. यातून वापर ३११ लाख गाठी आणि निर्यात २५ लाख गाठी होईल, असा अंदाज सीएआयनं व्यक्त केला.

याचाच अर्थ असा की, पुढील हंगामासाठी केवळ १३ लाख ८९ हजार म्हणजेच जवळपास १४ लाख गाठींचा साठा राहील. हा साठा ३५ ते ४० वर्षातील निचांकी असेल. यंदाच्या हंगामात मागील साठा ३२ लाख गाठी होता. तो पुढील वर्षी निम्माही नसेल.

पुढील हंगामात कापसाची लागवड नेमकी किती होईल, उत्पादन वाढेल की घटेल, हे आताच सांगता येणार नाही. पण सध्याचं बॅलन्सशीट पाहीलं तर कापसाची टंचाई दिसते. यामुळं कापसाच्या भावातही वाढ व्हायला पाहीजे.

तस तर हंगामाच्या सुरुवातीपासूनच सर्वांनाच माहीत होतं की उत्पादन कमी आहे. त्यातच शेतकऱ्यांनी कापसाची विक्री काही दिवस केली नाही. त्यामुळं दर सध्याच्या पातळीवर आहेत. नाहीतर दरात आणखी नरमाई दिसली असती, असं व्यापारी आणि जाणकारांनी सांगितलं.

कापूस उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळायला हवा. तो त्यांचा हक्क आहे. कारण यंदा कापसाचा उत्पादन खर्चच ८ हजारांच्या वर गेल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं.

पण बाजारभाव ८ हजारांच्या वर खूपच कमी वेळा टिकले. त्यामुळं उत्पादन खर्चावर समाधान मानावं लागल्याचंही शेतकरी सांगतात. आता चित्र स्पष्ट झालं. आतापर्यंत शेतकऱ्यांना तेजीचा लाभ मिळाला नाही. पुढील काळात बाजारात चांगली तेजी येऊ शकते. याचा फायदा शेतकऱ्यांना किती होईल, हे नंतरच कळेल. पण उद्योगांनी मात्र आपला डाव साधायला सुरुवात केली.

साउथर्न इंडिया मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी सॅम यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना पत्र लिहून कापूस आयातीवर असलेलं ११ टक्के शुल्क काढण्याची मागणी केली. देशात कापसाचे भाव जास्त आहेत, शेतकऱ्यांनी ४० टक्के कापूस मागं ठेवला त्यामुळं उद्योगांना कापूस मिळत नाही, भारताचं कापड महाग झालं, असं सांगत सॅम यांनी आपल्या उद्योगाची मागणी पुढं रेटली.

११ टक्के आयातशुल्क काढल्यास दर कमी होऊ शकतात. त्यामुळं ही मागणी सरकारनं मान्य करायला नको. त्याऐवजी कापूस आणि कापड निर्यातीसाठी अनुदान द्यायला हवे, असे जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT