Team Agrowon
देशातील कापूस उत्पादनात यंदाही घट झाली. गेल्यावर्षीप्रमाणं मोठ्या तेजीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागं ठेवला.
फेब्रुवारीपासून बाजारावर आवकेचा दबाव असल्यानं दर हंगामातील निचांकी पातळीवर आहेत. बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर कापूस दरात वाढ होईल, असा अंदाज आहे.
कापूस दराबाबत खुद्द काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनीही याबाबत सांगितलं.
बाजारातील आवक वाढल्यानं कापसाचे दर कमी झाले. अनेक जाणकारांच्या मते यंदाच्या हंगामात कापसाचे भाव कमी होण्यासाठी इतर घटक जास्त कारणीभूत नाहीत.
शेतकरी जास्त दिवस कापूस ठेऊ शकत नाहीत, त्यांना कापूस विकावाच लागतो. त्यामुळं बाजारात आवक वाढली आणि दर दबावात आले. चालू महिन्यात कापूस दरात २०० रुपयांपर्यंत वाढ झाल्यानंतर आवक पुन्हा वाढली.
चालू महिन्यात कापूस दरात २०० रुपयांपर्यंत वाढ झाल्यानंतर आवक पुन्हा वाढली. काही बाजारांमध्ये तर विक्रमी कापूस खरेदी झाली.
एप्रिलच्या मध्यानंतर कापूस आवक कमी होईल, असा अंदाज होता. पण आताही कापूस विक्री मोठ्या प्रमाणात होतेय. बरेच शेतकरी सांगतात की, आमच्या भागात शेतकऱ्यांकडे कापूस नाही.
अनेक भागातील शेतकरी दरवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. तर काही शेतकरी आता कापूस विकत आहेत. लवकरच बाजारातील आवकही कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दरातही वाढ होईल, असं व्यापारी, उद्योग आणि जाणकारही सांगत आहेत.