Cotton Market  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापसाच्या दरात आजही वाढ

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणेः कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात (Cotton Market) रोजच चढ उतार होत आहेत. काल सायंकाळपर्यंत सुधारलेले कापूस दर रात्री पुन्हा कमी झाले.

तर आज सकाळपासूनच दरात (Cotton Rate) सुधारणा पाहायला मिळाली. तर देशातील बाजारात आज किमान दरात मोठी वाढ झाली.

आपण रोज सीबाॅटवरील दराचा आढावा घेत असतो. पण सीबाॅटवर जवळपास २४ तास व्यवहार होत असतात. त्यामुळं वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या देशांतून व्यवहार होतात.

पण व्यवहार वाढतात ते रात्री ८ नंतर. त्यानंतर बाजार १ च्या दरम्यान बंद होतो आणि लगेच काही वेळाने पुन्हा सुरु होतो.

आता आपण सायंकाळपर्यंत बाजाराचा आढावा घेऊन विश्लेषण करत असतो. विश्लेषण करताना आधीच्या दिवसाचे बाजार बंद झाल्याचे दर आणि त्या दिवशीच्या सायंकाळपर्यंतच्या दराचा आढावा घेत असतो.

पण अनेकदा असं होतं की शेवटच्या टप्प्यात बाजारात दर पडतात किंवा वाढतात. त्यामुळं आपण कोणत्या वेळचे दर विचारात घेतले याचा उल्लेख करत असतो. 

काल, म्हणजेच ४ जानेवारीला दुपारी कापसाचे दर ८४.१४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. रुपयात हा दर १५ हजार २९८ रुपये होतो.

मात्र शेवटच्या टप्प्यात दरानं पुन्हा कच खाल्ली आणि रात्री ८०.८० सेंटवर बाजार बंद झाला. रुपयात सांगायचं झालं तर कापसाचे व्यवहार १४ हजार ६९४ रुपयांवर बंद झाले.

तर आज, म्हणजेच ५ जानेवारीला मध्यरात्री बाजार सुरु झाला तेव्हा कापूस दरात आणखी काहीशी घट झाली. दर ८०.४६ सेंटवर पोचले.

रुपयात हा दर १४ हजार ६२९ रुपये प्रतिक्विंटल होतो. मात्र त्यानंतर दरात वाढ होत गेली. आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कापसाचे वायदे ८२ सेंटवर पोचले होते.

रुपयात सांगायचं झालं तर हा दर १४ हजार ९०९ रुपये क्विंटल होतो.

देशातील दरपातळी
आज देशातील कापूस बाजारात किमान दर वाढले. म्हणजेच बाजारात कमीत कमी मिळणारा दर वाढला. हा दर कमी गुणवत्तेच्या कापसाला मिळत असतो.

देशातील किमान दर आज ७ हजार ५०० रुपयांवर पोचला. तर कमाल दरानं ९ हजार रुपयांची पातळी गाठली. देशातील बाजारात आज कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपये दर मिळाला.

आज देशातील बाजारात १०० ते २०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. आवकेचा विचार करता सध्या आवक मर्यादीत असल्याचं दिसतं.

राज्यातील दरपातळी
राज्यात आज कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ८ हजार ८५० रुपये दर मिळाला. आज काही बाजारांमध्ये कमाल दर ९ हजार रुपयांवर पोचला.

मात्र अशा बाजारांची संख्या कमी होती. तसंच त्या बाजारांमधील फार थोड्या कापसाला ९ हजार रुपये दर मिळाला.

दर किती वाढू शकतात?

देशातील कापूस दर हळूहळू वाढत आहेत. सध्या दरानं ९ हजारांचा टप्पा गाठला. सरासरी दर यापेक्षा काहीसा कमी आहे.

पण कापूस दर चांगल्या पातळीवर पोचण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना कापसासाठी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी कापूस दराचा आढावा घेऊनच विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT