
परभणी ः कापसाला प्रतिक्विंटल किमान १० हजार रुपये दर (Cotton Rate) मिळतील या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तूर्त कापूस साठवून (Cotton Stock) ठेवणे पसंत केले आहे. परिणामी कापसाच्या प्रमुख बाजारपेठा (Cotton Market) असलेल्या मानवत, सेलू, परभणी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कापसाची आवक कमी झाली आहे.
सेलू बाजार समितीत सोमवारी (ता. २६) किमान दर ७१०५, कमाल दर ७८८० तर सरासरी दर ७७५५ रुपये मिळाले. किमान दरात ७१०५ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २४) कापसाच्या १४० ते १५० गाड्या आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८४१० रुपये दर मिळाले.
शुक्रवारी (ता. २३) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८४१० रुपये तर सरासरी ८२४० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २२) कापसाची १०० ते ११० गाड्या आवक असताना प्रतिक्विंटल किमान ८१०० ते कमाल ८६२० रुपये तर सरासरी ८४७५ रुपये दर मिळाले.
बुधवारी (ता. २१) कापसाच्या ६० ते ७० गाड्यांची आवक असताना प्रतिक्विंटल किमान ८२०० ते कमाल ८६४० रुपये तर सरासरी तर ८५६० रुपये दर मिळाले. सेलू बाजार समितीत शनिवारी (ता. २४) कापसाला प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८२२५ रुपये तर सरासरी ८१५५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २३) कापसाला प्रतिक्विंटल किमान ८२०५ ते कमाल ८३५५ रुपये तर सरासरी ८३०० रुपये दर मिळाले.गुरुवारी (ता. २२) कापसाला प्रतिक्विंटल किमान ८०४० ते कमाल ८४४० रुपये तर सरासरी ८३८५ रुपये दर मिळाले.
परभणी बाजार समितीत गुरुवारी (ता. २२) कापसाची ५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ८१६० ते कमाल ८३३० रुपये तर सरासरी ८२५० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २०) कापसाची १०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८१०० ते कमाल ८२७५ रुपये तर सरासरी ८१९५ रुपये दर मिळाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.