Cotton Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस आवक घटली; दरात काहीशी सुधारणा

आज महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी ३५ हजार गाठी कापसाची आवक झाली होती. तर तेलंगणामध्ये २५ हजार गाठींची शेतकऱ्यांनी विक्री केली.

Anil Jadhao 

Cotton Rate : देशातील बाजारात आज कापसाची आवक (Cotton Arrival) घटली होती. त्यामुळं देशातील अनेक बाजारांमध्ये कापसाच्या किमान आणि कमाल दरात सुधारणा पाहायला मिळाली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र चढ उतार सुरुच होते.

आज कापसाची आवक कमी होती म्हणून दरात सुधारणा पाहायला मिळाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

देशातील अनेक महत्वाचे बाजार आज होळीनिमित्त (holi) बंद होते. मात्र काही ठिकाणी व्यवहारही पार पडले. होळीमुळे आज कापसाची आवक घटली होती.

तसचं दरातही सुधारणा पाहायला मिळाली. आज राज्यातील बाजारात कापसाची १ लाख ३२ हजार गाठी आवक झाली होती. शनिवारच्या तुलनेत आजची आवक २० लाख गाठींनी कमी राहिली. सणामुळं आवक कमी झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

आज महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी ३५ हजार गाठी कापसाची आवक झाली होती. तर तेलंगणामध्ये २५ हजार गाठींची शेतकऱ्यांनी विक्री केली. राजस्थानमधील बाजारात आज ९ हजार गाठी कापूस आला होता.

तर इतर राज्यांमधील आवक १० हजार गाठींपेक्षा कमीच होती. आजची आवक कमी असली तरी सरासरीपेक्षा काहीशी अधिक होती, असंही व्यापाऱ्यांनी सांगितलं.

कापसाची दरपातळी काय होती?

दरचा विचार करता आज कापूस दरात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. किमान दर आज अनेक बाजारांमध्ये ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचला होता.

तर सरासरी दरपातळी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपयांची होती. काही बाजारांमधील कमाल दरातही आज सुधारणा दिसून आली.

सरकीचे दर कसे राहिले?

सरकीच्या दरातही आज काही ठिकाणी सुधारणा झाली होती. आज सरकीला सरासरी ३ हजार २०० ते ३ हजार ५०० रुपये भाव मिळाला. तर सरकी ढेपेचे दर काही बाजारांमध्ये क्विंटलमागं ५० ते १०० रुपयाने सुधारले होते. आज सरकी ढेपेला सरासरी २ हजार ८०० ते ३ हजार १०० रुपयांचा दर मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती?

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. आज कापसाचे वायदे सायंकाळपर्यंत काहीसे कमी होऊन ८४ सेंटवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरु असले तरी सरासरी दरपातळी टिकून आहे.

अमेरिकेच्या कापसाला चीन आणि पाकिस्तानकडून उठाव मिळतोय. त्यामुळं दर टिकून आहेत.

दर वाढतील का?

देशातही सूतगिरण्यांकडून कापसाला उठाव आहे. निर्यातही सुरळीत आहे. सरकी पेंड आणि तेलाकडूनही आता आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं देशात कापसाचे भाव सुधारण्यास अनुकूल स्थिती आहे. मात्र उद्योगांकडून दर दबावात ठेवले जात आहेत.

तरीही शेतकऱ्यांनी कापसाची मर्यादीत विक्री ठेवल्यास कापूस दरात जास्त नरमाई येणार नाही. कापसाचा सरासरी भाव ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो.

तर आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT