Cotton Market  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Sowing : चीनमध्ये कापूस लागवडीला सुरुवात; लवकरच गती वाढणार

चीनमध्ये कापूस उत्पादनात शिनजियांग प्रांत महत्वाचा आहे. शिनजियांगमध्ये आता कापूस लागवड सुरु झाली. सध्या लागवडीला पोषक वातावरण असल्याचे येथील प्रशासनाने सांगितले आहे.

Team Agrowon

उरम्की, चीनः जगातील महत्वाचा कापूस (Cotton) वापरकर्ता आणि आयादार चीनमध्ये कापूस लागवड सुरु झाली आहे. कापूस लागवड दोन दिवसांमध्ये चांगलीच गती घेण्याची शक्यता आहे. शिनजियांग प्रांतात चीनमधील ९० टक्के कापूस उत्पादन होते.

या प्रांतात वाढलेली कापूस लागवड (Cotton Cultivation) आणि यांत्रिकिकरण यामुळे चीनमधील कापूस उत्पादनही वाढत आहे.

चीन जगातील सर्वात मोठा कापूस वापरकर्ता आणि आयातदार आहे. २०२२-२३ च्या हंगामात चीनमध्ये कापूस उत्पादन वाढून २३० लाख गाठींवर पोचले होते. तर मागील हंगामात २०९ लाख गाठी उत्पादन झाले होते. चीनमध्ये कापड उद्योग चांंगल्या प्रमाणात विकसित झाला.

त्यामुळे चीनला कापड आयातही मोठ्या प्रमाणात करावी लागते. चीनमध्ये होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी तब्बल ९० टक्के कापूस उत्पादन शिनजियांग प्रांतात होते. या भागात कापूस पिकाला पोषक वातावरण असल्याने शेतकरी कापसाला प्राधान्य देत आहेत.

चीनमध्ये कापूस उत्पादनात शिनजियांग प्रांत महत्वाचा आहे. शिनजियांगमध्ये आता कापूस लागवड सुरु झाली. सध्या लागवडीला पोषक वातावरण असल्याचे येथील प्रशासनाने सांगितले आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये कापूस लागवडीला वेग येईल, असेही सांगिण्यात आले. दक्षिण शिनजियांगमध्ये ५ एप्रिलनंतर लागवडीचा वेग अधिक राहण्याचा अंदाज आहे.

मागील हंगामाचा विचार करता उत्पादन १० टक्क्यांनी वाढले होते. २०२२ मध्ये शिनजियांग प्रांतात जवळपास २५ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. तर ५४ लाख टन कापूस उत्पादन झाले होते. म्हणजेच देशातील एकूण कापूस उत्पादनापैकी तब्बल ९० टक्के उत्पादन शिनजियांग प्रांतात झाले होते.

यांत्रिकिकरणाचा वापर वाढला

शिनजियांग प्रांतातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातील कापूस उत्पादन यंदाही कायम राहण्याचा अंदाज आहे. यंदा या भागात उत्पादन ५० लाख टनांपेक्षा जास्तच राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिनजियांगमध्ये कापूस उत्पाकताही मागील काही वर्षांपासून वाढत आहे. येथील शेतकरी सघन कापूस लागवडीची पध्दतही आत्मसात करत आहे. त्यामुळे प्रतिहेक्टरी उत्पादकता अधिक येत आहे. या भागातील जवळपास ९४ टक्के कापूस लागवड आणि काढणी यंत्राच्या साह्याने होते, असेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT