Cotton production
Cotton production agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस दर हंगामातील निचांकी पातळीवर !

Anil Jadhao 

Cotton Rate : मार्च उजाडला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित कापूस दरपातळी (Cotton Bajarbhav) झाली नाही. त्यामुळं सध्या शेतकरी कापूस विकत आहेत. बाजारात आवकेचा दबावा वाढल्यानं दरही दबावात आले. सध्या कापूस भाव हंगामातील निचांकी पातळीवर पोचला.

तर मार्च महिन्यात कापूस आवक आणखी वाढू शकते, असा अंदाज व्यापारी आणि उद्योगाकडून व्यक्त केला जात आहे. पण एप्रिल पासून आवक कमी राहून दरही सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कापसाची आवक वाढली. कापसाची आवक वाढल्यानं सरकी आणि सरकी पेंडेवर दबाव आला. सरकारी आणि सरकी पेंडेच्या दर कमी झाल्याचा आणखी दबाव कापसावर येत गेला.

त्यामुळं कापूस दर दबावात आले. सध्या कापसाचे भाव चालू हंगामातील निचांकी पातळीवर पोचले. कापसाला कमाल दर अनेक बाजारांमध्ये सध्या ८ हजार रुपयांवर आला. तर किमान दर बहुतेक बाजारांमध्ये ७ हजारांवर पोचला.

फेब्रुवारी महिन्यापर्यंत बाजारातील आवक मर्यादीत होती. त्यामुळं कापूस, सरकी आणि सरकी पेंडेचे दरही टिकून होते. कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये भाव मिळत होता. पण दरवर्षी एखाद्या महिन्यात कापूस आवकेचा दबाव येत असतो.

एरव्ही आवकेचा दबाव डिसेंबर आणि जानेवारीत असतो. पण यंदा बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस चांगल्या दराच्या अपेक्षेने मागे ठेवला होता. त्यामुळं डिसेंबर आणि जानेवारी दर टिकून होते.

शेतकऱ्यांकडे कापूस असल्याने हा कापूस फेब्रुवारी आणि मार्चमध्ये बाहेर येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यातच वाढते ऊन आणि बाजारातील तेजीचा अभाव यामुळे अनेक शेतकऱ्यांचा संयम सुटल्याचे मराठवडा आणि खानदेशातील शेतकरी सांगत आहेत.

तसेच मार्च महिन्यातील देणीघेणी भावण्यासाठी शेतकरी कापूस विकू शकतात, अशी बाजारात चर्चा आहे.

आजची बाजारातील स्थिती

सध्या बाजारातील आवक गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. मागीलवर्षी ११ मार्चला बाजारात जवळपास ६० हजार गाठी कापसाची आवक झाली होती. ती आज १३२ लाख गाठींवर पोचली. म्हणजेच आवक दुप्पट झाली.

बाजारातील कापसाची आवक वाढल्यानं दर ७ हजार ७०० ते ८ हजार २०० रुपयांपर्यंत पोचले. तसचं मार्च महिन्यात कापूस आवक आणखी वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दर वाढतील का?

एप्रिल महिन्यात आवकेचा दबाव कमी होऊ शकतो, असा अंदाज शेतकरी आणि बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. सध्या आवकेचा दबाव असल्यानं दर नरमले. पण आवक कमी झाल्यास दर सुधारु शकतात.

शेतकऱ्यांनी कापसाला ८ हजार ५०० रुपयांचे टार्गेट ठेवण्यास हरकत नाही. तसेच बाजारातील आवक घटल्यानंतर दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

त्यामुळं शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळून, बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT