Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

Agriculture Department: राज्य शासनाच्या कृषी विभागाने अलीकडेच ‘महाकृषी’ ॲप या प्रणालीवर फिल्डवरील कामांची थेट नोंद घेण्याची नवी अंमलबजावणी सुरू केली आहे. या निर्णयामुळे कृषी खात्यात नव्या कार्यसंस्कृतीचा प्रारंभ झाला असला, तरी यासंबंधी संमिश्र प्रतिक्रियाही उमटत आहेत.
Mahakrushi App
Mahakrushi AppAgrowon
Published on
Updated on

Akola News: राज्य शासनाच्या कृषी विभागाने अलीकडेच ‘महाकृषी’ ॲप या प्रणालीवर फिल्डवरील कामांची थेट नोंद घेण्याची नवी अंमलबजावणी सुरू केली आहे. या निर्णयामुळे कृषी खात्यात नव्या कार्यसंस्कृतीचा प्रारंभ झाला असला, तरी यासंबंधी संमिश्र प्रतिक्रियाही उमटत आहेत. काहींना हा प्रकार त्रासदायक वाटू लागला आहे तर काहींना हा प्रकाराचे स्वागत केले आहे.

नोंदीबाबतची तेवढी सवलत जागेवर न करता ऑफलाइनची मागणी होत आहे. तर अधिकारी स्तरावर याचे समर्थन होत आहे. जे फिल्डवर जायला टाळाटाळ करायचे त्यांना आता या नव्या प्रकारामुळे प्रत्यक्ष फिल्डवर जावे लागत असून त्यांची अधिक नाराजी आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mahakrushi App
Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

नवीन प्रणालीनुसार, फिल्डवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शेतकरी भेटी, शेती शाळा, प्रात्यक्षिके, नुकसान पाहणी अशा कामांची त्वरित नोंद अ‍ॅपवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिणामी, फील्ड कामाचा तपशील आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि कामाचे पारदर्शक मूल्यांकन शक्य झाले आहे, असा दावा केला जातो.

शिवाय या नव्या प्रणालीमुळे कार्यालयीन कामाचा भार कमी होऊन कामाचे प्रामाणिक नोंदीकरण शक्य झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आता कोण किती काम करतो आहे, कोण फिल्डवर आहे की नाही हे लगेच समजते. ही कार्यपद्धती पारदर्शक आणि परिणामकारक ठरेल. काही जिल्ह्यांमध्ये यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत सेवा पोहोचण्याचा वेगही वाढल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

Mahakrushi App
Live Stock App: पशुपालनासाठी होणार 'एआय' आधारित मोबाइल ॲपचा वापर

तथापि, काही कर्मचाऱ्यांनी या नव्या अ‍ॅप आधारित कामकाजावर आधीच नाराजी व्यक्त केली आहे. दैनंदिन कामांमध्ये आधीच वेळेचा तुटवडा असताना, अ‍ॅपद्वारे फोटो, लोकेशन व नोंदी करण्याचा तगादा वाढतो आहे.

कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, की अडचणी असल्या तरी या प्रणालीचा उद्देश चांगला आहे. सुरुवातीस अडथळे येणे स्वाभाविक आहे, पण यावर प्रशिक्षण व मार्गदर्शनाद्वारे उपाययोजना करण्यात येतील. तसेच अ‍ॅपमधील तांत्रिक सुधारणादेखील सातत्याने होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com