Chana Market Agrowon
ॲग्रोमनी

Chana Market : वाढलेल्या उष्णतेचा हरभऱ्याला फटका; बाजार सुधारणेचे संकेत

Anil Jadhao 

Chana Market Update : फेब्रुवारी महिन्यात १९०१ नंतरचे सर्वाधिक तापमान होते. त्यामुळे हरभरा पिकाला (Chan Crop Damage) फटका बसत आहे. मार्च महिन्यातही उष्णता जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा सरकारच्या अंदाजापेक्षा उत्पादन (Chana Production) कमीच राहील.

तसेच वाढती उष्णता आणि एल निनोच्या (El Nino) चर्चेमुळे हरभरा बाजाराला (Chana Market) आधार मिळू शकतो, असा अंदाज हरभरा (Chana Rate) बाजारातील व्यापारी आणि विश्लेषक व्यक्त करत आहेत.

मागील हंगामात नाफेडने (NAFED) हरभऱ्याची मोठी खरेदी (Chana Procurement) केली होती. तसेच मागील वर्षभर टप्प्याटप्प्याने हरभरा विक्री केली. राज्यांना कमी दरात हरभरा देऊ केला.

नाफेडच्या विक्रीमुळे हरभरा बाजार मागील वर्षभर दबावातच राहिला. दुसरीकडे नाफेडकडे सध्याही हरभऱ्याचा १५ ते १६ लाख टन साठा आहे. बाजार सध्या दबावात असल्याने नाफेडला खरेदीत उतरणे गरजेचे आहे.

नाफेडने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये हमीभावाने खेरदीसाठी नोंदणी सुरु केली. पण प्रत्यक्ष खरेदीला आणखी वेळ लागेल. नाफेडकडे यंदा मागील हंगामातील शिल्लक हरभरा जास्त असल्यानं यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमी खरेदीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यातच सध्या खुल्या बाजारात हमीभावापेक्षा ५०० रुपयांपर्यंत कमी दर आहेत. त्यामुळे हरभरा बाजाराला यंदा नाफेडची खरेदी आणि उत्पादन कसे राहते यावर अवलंबून आहे.

सध्या खुल्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर सरकारने यंदा ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. देशातील काही ठिकाणी हरभऱ्याची कमी अधिक प्रमाणात आवक सुरु झाली.

मात्र आवकेचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. तरीही हरभरा दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. नाफेडच्या विक्रमीमुळे दर दबावात आहेत. नाफेडने मागील हंगामात २५ लाख टनांच्या दरम्यान हरभार खरेदी केला होता. त्याची विक्री टप्प्याटप्प्याने केली. सध्याही काही ठिकाणी नाफेड हरभरा विकत आहे.

कडधान्य उत्पादनात घट

नाफेडच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव आहे. व्यापारी आणि स्टाॅकिस्ट वाढलेल्या दरात खरेदीस इच्छूक नाहीत. त्यामुळे दरावर दबाव कायम आहे. पण फेब्रुवारीत हरभरा पिकाला उष्णतेचा फटका बसला. तर मार्च महिन्यातही ऊन जास्तच राहण्याचा अंदाज आहे.

यामुळं उत्पादनातील घट जास्त वाढण्याचा अंदाज आहे. यंदा तुरीचेही उत्पादन कमी राहिले. त्यामुळं हरभऱ्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे.

एल निनोच्या चर्चेचाही परिणाम शक्य

एल निनो स्थितीमुळे माॅन्सून काळात पाऊस कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आताच याविषयी ठामपणे सांगता येणार नाही. एप्रिल किंवा मे महिन्यात भारतीय हवामान विभाग याविषयी सविस्तर सांगेल. पण सध्या बाजारात कमी पावसाची चर्चा सुरु आहे.

खरचं कमी पाऊस झाल्यास खरिपासह रब्बीतील पिकांनावरही अवकळा येऊ शकते. माॅन्सून काळात पाऊस कमी राहिल्यास हरभरा बाजाराला नक्कीच आधार मिळेल.

बाजारात चर्चा

हरभरा उत्पादन आणि पावसाची स्थिती त्या त्या काळात स्पष्ट होईल. पण सध्याच्या चर्चेमुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार होत आहे.

नाफेड खेदीत उतरले आणि उष्णतेचा कडाका वाढला तर खुल्या बाजारातही हरभरा भाव हमिभावाच्या आसपास राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि विश्लेषकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT