Soybean Agrowon
ॲग्रोमनी

कोरोनातही शेतीमालाची घोडदौड कायम

लातूरच्या अडत बाजारात ४४ लाख क्विंटल आवक

हरी तुगावकर

लातूर ः कोरोनाचा गेले वर्षभर सर्वच घटकावर परिणाम झाला आहे. काही प्रमाणात शेतीवरही झाला आहे. पण शेतकऱ्यांनी मेहनत घेत पिके घेतली. निसर्गानेही साथ दिली. यातून मोठ्या प्रमाणात लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात वर्षभर शेतीमालाची आवक चांगली राहिली. मार्चअखेर या अडत बाजारात ४४ लाख ५८ हजार क्विंटल शेतीमालाची आवक राहिली. काही शेतीमालाला चांगला भाव मिळाल्याने चार पैसेही शेतकऱ्यांच्या पदरात पडले.

सोयाबीनने भाव खाल्ला

गेल्या वर्षी शेतकऱ्यांजवळचे सोयाबीन संपल्यानंतर भाव वधारले होते. अकरा हजारांपर्यंत भाव गेले होते. पण या वर्षी मात्र हंगाम सुरू झाल्यापासूनच सोयाबीनला चांगला भाव मिळत गेला. सरासरी सात हजार रुपये क्विंटल भाव राहिला. या वर्षी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला होता. पण शेतकऱ्यांनी मात्र भाव वाढतील या अपेक्षेने सोयाबीन म्हणावे तसे बाजारात आणले नसल्याचे चित्र आहे. वर्षभरात १९ लाख क्विंटल सोयाबीनची आवक राहिली. उन्हाळी सोयाबीन निघाले तर भाव सात हजारांच्या घरातच राहिले.

लग्नसराईत आवक वाढली

दिवाळीच्या अगोदरच बाजारपेठेत शेतीमालाची आवक सुरू होते. या वर्षीही सुरू झाली पण लग्नसराईत मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल अडत बाजारात आणला. सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद, मूग, गूळ, साळी, गहू, ज्वारी, बाजरी, मका, करडी, चिंच यांची आवक बाजारपेठेत राहिली. मार्चअखेर ४४ लाख ५८ हजार २४३ क्विंटल आवक राहिली. काहींना समाधानकारक तर काहींना हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला.

तारण योजनेत २१ हजार क्विंटल सोयाबीन

बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव आल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विकावे या करीता लातूर बाजार समितीने शेतीमाल तारण योजना सुरू केली. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडावे हा उद्देश आहे. यालाही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. ५५६ शेतकऱ्यांनी या योजनेत २१ हजार क्विंटल सोयाबीन ठेवले. यात बाजार समितीने त्यांना सहा टक्के दराने सहा कोटी ३२ लाख रुपये कर्जही दिले.

१९ कोटींचे मार्केट शुल्क शेतकऱ्यांवर या वर्षीही कोरोनाचे संकट होते. तरीदेखील बाजार समितीच्या अडत बाजारात शेतीमालाची आवक चांगली राहिली आहे. ४४ लाख क्विंटलवर ही शेतमालाची आवक राहिली. यात सोबायीनची सर्वांत जास्त आवक होती. कोट्यवधींची उलाढाल झाली. यातून बाजार समितीला १९ कोटी ८९ लाख १३ हजार ६५८ रुपये मार्केट शुल्क मिळाले.
- भगवान दुधाटे, प्रशासक, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT