Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton market : कापूस उत्पादनात १४ वर्षांतील सर्वात मोठी घट

काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने नुकतेच एप्रिल महिन्यातील आपला अंदाज जाहीर केला.

Anil Jadhao 

Cotton Rate Update : काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने नुकतेच एप्रिल महिन्यातील आपला अंदाज जाहीर केला. या अंदाजात सीएआयने भारतातील कापूस उत्पादन यंदा ३०३ लाख गाठींवर स्थिरावेल, असे म्हटले. म्हणजेच यंदा २००९-१० नंतर पहिल्यांदाच उत्पादनात एवढी घट झाली.

देशातील कापूस पिकाला यंदा पाऊस आणि कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळं उत्पादन ३०३ लाख गाठींवरच स्थिरावले, असे सीएआयने बुधवारी झालेल्या बैठकीत सांगितले.

देशातील कापूस उत्पादन २००९-१० नंतर पहिल्यांदाच उत्पादन या पातळीवर पोचले. देशातील उत्पादनापैकी ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांमध्ये बाजारात जवळपास १९१ लाख गाठी कापसाची आवक झाली.

सीएआयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, तेलंगणा आणि पंजाबमध्ये उत्पादन कमी करण्यात आले. तेलंगणातील उत्पादनाचा अंदाज ५ लाख गाठींनी कमी करण्यात आला. तर महाराष्ट्राचा अंदाज ३ लाख गाठी आणि पंजाबचा अंदाज २ लाख गाठींनी कमी करण्यात आला. म्हणजेच दशपातळीवरील अंदाजात १० लाख गाठींची कपात करण्यात आली.

मार्च महिन्यातील अंदाज सीएआयने भारत यंदा १२ लाख गाठी कापूस आयात करेल, असे म्हटले होते. पण एप्रिलमध्ये उत्पादनाच्या अंदजात मोठी घट केल्याने निर्यातीचा अंदाज वाढवला.

भारत यंदा १५ लाख गाठी कापूस आयात करेल. तर मागील हंगामात १४ लाख गाठी कापूस आयात झाला होता, असंही सीएआयने म्हटले आहे. देशातील यंदाचं उत्पादन, मागील हंगामातील शिल्लक साठा आणि आयात धरून यंदा ३५० लाख गाठी कापसाचा पुरवठा होईल.

पण दुसरीकडे सीएआयने भारताचा कापूस वापर वाढवून ३११ लाख गाठींपर्यंत नेला. मात्र यंदाचा वापर गेल्यावर्षीच्या ३१८ लाख गाठींपेक्षा कमीच राहील. यंदा मिल्सचा वापर २८० लाख गाठींचा राहील. तर कापूस निर्यातीचा अंदाज ५ लाख गाठींनी कमी करण्यात आला.

आधीचा अंदाज ३० लाख गाठींचा होता, तो आता २५ लाख गाठींपर्यंत कमी करण्यात आला. तर ३१ मार्चपर्यंत देशातून १० लाख ५० हजार गाठींची निर्यात झाल्याचेही सीएआयनेही म्हटले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Scheme : लाडकी बहिण योजनेचा जिल्हा परिषदेच्या १ हजार १८३ कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ; प्रकरण आले उघडकीस

Rain Crop Damage : सततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगांना फुटले कोंब

Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गाला पुराचा तडाखा; जनजीवन विस्कळीत

Sangli Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ७३ टक्के पाणीसाठा

Sangli Rainfall : दुष्काळी भागातील पिकांना पाऊस ठरतोय उपयुक्त

SCROLL FOR NEXT