Banana  Agrowon
ॲग्रोमनी

अर्धापूरच्या केळीला देशात सर्वाधिक दर

बाजारात १८०० ते १९०० रुपये दर

टीम ॲग्रोवन

नांदेड : बाजारात आवक कमी (Low Arrival) असल्यामुळे देशभरात प्रसिद्ध अर्धापूरच्या केळीला (Ardhapur Banana) पहिल्यांदाच बाजारपेठेत चांगला भाव (Banana Price) मिळत आहे. १८०० ते २००० रुपये दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. केळीच्या भावात (Banana Rate) सुधारणा झाल्याने बागायतदारांकडून समाधान व्यक्त होत आहे.

मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊन, विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे केळी उत्पादकांना लागवडीचा खर्चही निघत नव्हता. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. मागीलवर्षी चांगले पाऊसमान झाल्याने इसापूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. या प्रकल्पाच्या पाण्यावर अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड झाली होती. रमजानमध्ये केळीला मागणी असते. महिना संपल्यानंतरही उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

बाजारात सध्या आंब्याची आवक कमी आहे. तसेच केळीचीही आवक सर्वसाधारण असल्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. सध्या दररोज ८० ते १०० टन केळीची आवक बाजारात होत आहे. या केळीला १८०० ते २००० रुपये दर मिळत आहे.

देशा-विदेशात अर्धापूरच्या केळीचा डंका

अर्धापूरची केळी चविष्ट अन् टिकाऊ असल्याने अफगाणिस्तान, तुर्कस्तान, दुबई व दिल्ली, जम्मू काश्मीर, चंदीगड, हरियाना, उत्तर प्रदेश, पंजाब व राजस्थान तर दक्षिण भारतातील तेलंगाणा, तमिळनाडू, ओडिशा व आंध्रप्रदेश या राज्यांत मागणी आहे.

केळीला पहिल्यांदाच उच्चांकी दर सध्या देशात सर्वाधिक दर नांदेडच्या केळीला मिळत आहे. येथील केळीची चव तसेच गुणवत्ता चांगली असल्याने केळी प्रतिक्विंटल दोन हजार रुपये दर मिळत आहे. सध्या हैदराबाद, नागपूर, करीमनगर, बल्हारशाह, चंद्रपूर आदी ठिकाणी माल पाठवला जात आहे.
निलेश देशमुख, केळी व्यापारी, अर्धापूर, जि. नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Heavy Rain: मराठवाड्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

Citrus Farming: संत्रा काढणी होईपर्यंत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

Gram Pnchayat: सोलापूर जिल्ह्यात १८६ ग्रामपंचायतींमधील गुंठेवारी होणार नियमित

Agriculture Minister Bharane: शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे; भरणे

Agrowon Podcast: कापसावरील दबाव कायम; मुगाचे भाव घसरले, तोंडलीला उठाव, पेरुची आवक घटली तर बाजरीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT