Parbhani News: मराठवाडा विभागामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. रविवारी (ता. २१) सकाळी साडे आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यामध्ये सरासरी ७.८ मिमी पाऊस झाला.छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड या ३ जिल्ह्यातील ९ मंडलामध्ये अतिवृष्टी झाली. धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील ६ मंडलामध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ७.७ मिमी,सप्टेंबर महिन्यात आजवर १५४.७ मिमी तर १ जून पासून एकूण सरासरी ६३५ मिमी (११८.४ टक्के) पाऊस झाला. जालना जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी २.४ मिमी, सप्टेंबर महिन्यात सरासरी १५९.९ मिमी तर १ जून पासून एकूण सरासरी ७००.४ मिमी (१२४.५ टक्के )पाऊस झाला..Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच.परभणी जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १.९ मिमी, सप्टेंबर महिन्यात आजवर सरासरी १६६.५ मिमी तर १ जून पासून सरासरी ७३६.४ मिमी (१०३.६ टक्के) पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी ०० मिमी, सप्टेंबर महिन्यात सरासरी २२२.९ मिमी तर १ जून पासून एकूण सरासरी ९५४.१ मिमी (१२६.२ टक्के) पाऊस झाला..Heavy Rain Marathwada : मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर .नांदेड जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १०.७ मिमी, सप्टेंबर महिन्यात सरासरी १८०.४ मिमी तर १ जून पासून आजवर एकूण सरासरी ९७८.९ मिमी (१२८.१ टक्के) पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १७.३ मिमी, सप्टेंबरमध्ये सरासरी १७०.५ मिमी तर १ जून पासून ७२९ मिमी (१११.९ टक्के) पाऊस झाला..धाराशिव जिल्ह्यत २४ तासांमध्ये सरासरी १४.८ मिमी, सप्टेंबर महिन्यात सरासरी १८४.१ मिमी तर १ जून पासून सरासरी ६९४.२ मिमी (१२६.७ टक्के) पाऊस झाला. बीड जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी २.७ मिमी, सप्टेंबर मध्ये सरासरी १८० मिमी तर १ जून पासून सरासरी ६६१.२ मिमी (१२८.५ टक्के) पाऊस झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.