Nanded News: नांदेड जिल्ह्यासह राज्यात पावसामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील दीड हजारांवर गावातील शेती बाधित झाली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. नांदेड जिल्ह्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (ता.२०) पत्रकारांशी संवाद साधताना दिली..अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना खूप मोठा फटाका बसला. नदी नाल्यांच्या काठावरील शेती खरडुन गेली आहे. तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (ता. २०) धावत्या दौऱ्यात केली केली..Agriculture Minister Dattatray Bharane : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारे काम करा: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे .यावेळी शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करणे, शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तीन हेक्टर करणे, नदी नाल्यांच्या काठावरील शेतकऱ्यांना जादा मदत करणे, शेतकऱ्यांना सरसगट मदत देण्यात, एनडीआरफच्या निकष प्रमाणे मदत देण्यात यावी अशी मागणी करून आपल्या व्यथा मांडल्या..अर्धापूर तालुक्यातील पिंपळगावचे उपसरपंच संतोष कल्याणकर यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत घेण्याची मागणी केली. प्रशासनाच्यावतीने मंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यात येत नाही अशी तक्रार कृषीमंत्र्यांकडे केली..Agriculture Minister Bharane: शेतकऱ्यांना आनंदी करणारे कामकाज करू: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.पिकांची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे खूप मोठं नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना जास्त जास्त मदत देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत आहेत..बाधित शेतीचे पंचनामे करण्यात येत असून शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल. नांदेड जिल्ह्यातील नुकसान खूप मोठे मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी माहिती कृषीमंत्री भरणे यांनी दिली..यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी सभापती बाबूराव हेंदे, तालुकाध्यक्ष आत्माराम पाटील कपाटे, माजी अध्यक्ष निशिकांत पाटील क्षिरसागर, भगवान पाटील तिडके, तहसीलदार रेणुकादास देवणीकर, तालुका कृषी अधिकारी सुनील देवकांबळे, नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे, मंडळ अधिकारी सुरेश तांबारे, तलाठी प्रदिप उबाळे ,विलीस देशमुख, महेश राजेगोरे आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.