Solar Pump Set Agrowon
ॲग्रोमनी

सौर कृषिपंपांसाठी ९० टक्के अनुदान

सौरऊर्जेवरील कृषिपंपांसाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थी शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या किमतीच्या १० टक्के, तर अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना कृषिपंप किमतीच्या ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावयाचा आहे

ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर : महाकृषी अभियानांतर्गत पंतप्रधान ‘कुसुम घटक’योजनेतून ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जेवरील कृषिपंपांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक वैभवकुमार पाथोडे यांनी दिली.

सौरऊर्जेवरील कृषिपंपांसाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थी शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या किमतीच्या १० टक्के, तर अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना कृषिपंप किमतीच्या ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावयाचा आहे. सौर कृषिपंपांची उर्वरित रक्कम सर्वसाधारणसाठी ९० टक्के, तर अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी ९५ टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येईल.

शेतकऱ्यांच्या जमीनधारणा क्षमतेनुसार तीन एचपी, पाच एचपी व ७.५ एचपी डीसी सौरपंप देण्यात येतील. अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या हिस्स्याची रक्कम ऑनलाइन अथवा एनईएफटी ट्रान्स्फरद्वारे भरायची आहे. तसेच भरणा केलेल्या रकमेचा यूसीआर क्रमांक असलेली कॉपी कुसुम पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. यासंदर्भात अडचणी असल्यास महाऊर्जाच्या विभागीय कार्यालय दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५३१६०२, २५६४२५६ संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT