Chana Market
Chana Market  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Update : हरभऱ्याचे ५१ कोटी ९३ लाख रुपयांवर चुकारे अदा

Team Agrowon

Parbhani Chana Rate : किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत यंदा परभणी-हिंगोली जिल्ह्यांमध्ये हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) नाफेड वतीने राज्य सहकारी पणन महासंघाच्या केंद्रांतर्गत ५ हजार २२९ शेतकऱ्यांना ९७ हजार ३५३ क्विंटल हरभऱ्याचे ५१ कोटी ९३ लाख ७८ हजार ६८१ रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

या दोन जिल्ह्यांतील १८ केंद्रांवर गुरुवार (ता. ५) पर्यंत नोंदणीकृत १२ हजार ७९८ शेतकऱ्यांकडून २ लाख १ हजार ३३० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवर ६ हजार ६१४ शेतकऱ्यांकडून १ लाख ४ हजार ३७३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यातील ९ केंद्रांवर ६ हजार १८४ शेतकऱ्यांकडून ९६ हजार ९५७ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. या दोन जिल्ह्यांत आजवर खरेदी करण्यात आलेल्या हरभऱ्याची एकूण किंमत १०७ कोटी ४० लाख ९८ हजार ६९७ रुपये आहे.

५१ कोटी ९३ लाखांवर चुकारे अदा

परभणी जिल्ह्यातील ८ केंद्रांवरील ५९ हजार १२० क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यातील ८ केंद्रांवरील ६९ हजार ४०८ क्विंटल असा एकूण १ लाख २८ हजार ५२८ क्विंटल महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला आहे.

जिल्ह्यात वाढीव उद्दिष्टानुसार खरेदी..किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्याला दिलेले ४ लाख ३१ हजार १९० क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट संपल्यामुळे मंगळवार (ता. २५) पासून खरेदी बंद आहे.

राज्य शासनाने जिल्ह्यासाठी ९५ हजार ९८५ क्विंटल वाढीव उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. ८) हरभरा खरेदी सुरू करण्याचे आदेश देण्यात येतील असे शेवाळे यांनी सांगितले.

हरभरा चुकारे अदायगी स्थिती (हरभरा क्विंटलमध्ये, चुकारे कोटी रुपये)

केंद्र - शेतकरी संख्या- हरभरा- चुकारे रक्कम

परभणी- १५७ - ३५६६- १.९०२७

जिंतूर- १२५ - २०७४ - १.१०६४

बोरी - ४०५ - ७१८२ - ३.८३१८

सेलू- ५२०- १०२४९- ५.६७८४

मानवत - ३९०- ५७७२- ३.७९३६

पाथरी - ४४५- ६५१५ - ३.४७६२

सोनपेठ - १५८ - ३२६७- १.७४३३

पूर्णा - ३५५ - ५९८१- ३.१९०८

हिंगोली - ६०२- ११०७३- ५.९०७७

कनेरगाव - ५१८ - १०२२२ - ५.४५३४

कळमनुरी - ४०९- ८८८५- ४.७४०१

वारंगा - ४५- ८४७ - ०.४५१

वसमत- ७५ - ८८२ - ०.४७०५

जवळा बाजार - ४१२- ८९०८- ४.७५२४

सेनगाव - ४२४ - ८६९२ - ४.६३७४

साखरा - १८९- ३२३४ - १.७२५६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT